Agriculture news in Marathi Finding farmers in trouble in Akola District Opportunities for crop direct sales | Agrowon

अकोला जिल्ह्यात अडचणीत शेतकरी शोधतायेत थेट विक्रीतून संधी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 एप्रिल 2020

अकोला ः अकोल्यात ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने भाजीपाला, फळ विक्रीबाबत अडचणी वाढल्या आहेत. अशा स्थितीत शेतकरी गट कृषी विभागाची मदत घेत थेट विक्री करीत आहेत. यातून ग्राहकांना चांगला शेतमाल मिळत असून शेतकऱ्यांची अडचणही कमी होऊ लागली आहे. 

अकोला ः अकोल्यात ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने भाजीपाला, फळ विक्रीबाबत अडचणी वाढल्या आहेत. अशा स्थितीत शेतकरी गट कृषी विभागाची मदत घेत थेट विक्री करीत आहेत. यातून ग्राहकांना चांगला शेतमाल मिळत असून शेतकऱ्यांची अडचणही कमी होऊ लागली आहे. 

शहरात थेट विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. बुधवारी (ता.आठ) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनात वाशिंबा येथील शेतकरी गटाच्या फळविक्री केंद्राचे उदघाटन झाले. 

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुळकर्णी, तालुका कृषी अधिकारी डी. एस. प्रधान, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप राऊत, कृषी सहायक मंगेश मुकुंदे यांची उपस्थिती होती.  

शेतातील तयार झालेल्या मालाची वाशींबा येथील महात्मा फुले शेतकरी स्वंय सहाय्यता गटामार्फत ताजे कलिंगड थेट ग्राहकांना माफक दरात विक्री करण्यात येत आहे. या ठिकाणी ‘कोरोना’च्या अनुषंगाने प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत गटाचे अध्यक्ष प्रमोद तायडे यांना मार्गदर्शन केले. 

अकोला तालुक्यातील इतर शेतकरी गटांनी शेतातील उत्पादित मालाची विक्री करावी याबाबत शेतकऱ्यांना व शेतकरी गटांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

शेतकरी गटांना भाजीपाला, फळविक्री करिता परवाना देण्यात येत असून त्याकरिता (आत्मा) यंत्रणा अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी डी. एस. प्रधान यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...