नगरमधील ६७ छावणीचालक संस्थांना दंड 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  : पशुधनाच्या सेवेत कुचराई करणाऱ्या जिल्ह्यातील ६७ छावणीचालक मंजूर संस्थांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने १४ लाख १६ हजार २४० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दोन टप्प्यांत ही कारवाई झाली आहे. आता पुन्हा याची पुनरावृत्ती झाल्यास या संस्थांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. 

पशुधन वाचविण्यासाठी प्रशासनाने आजअखेर ३५१ छावण्या मंजूर केल्या आहेत. त्यापैकी ३०३ छावण्या सुरू आहेत. पशुधनाला योग्य सुविधा उपलब्ध करून देणे संस्थांसाठी बंधनकारक आहे. त्यासाठी छावण्यांची तपासणी करण्यासाठी ३२ पथके तैनात करण्यात आली आहेत. छावण्यांत अनियमितता आढळल्याने यापूर्वी दोन संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पारनेर तालुक्‍यातील भाळवणी येथील संकल्प युवा प्रतिष्ठान आणि कर्जत तालुक्‍यातील घुमरी येथील श्रीराम अंध, अपंग औद्योगिक संस्थेचा यात समावेश होता. दोन्ही संस्थांना मिळून ७० हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर आणखी ६७ छावणीचालक संस्थांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. चार दिवसांपूर्वी ४५ संस्थांना लाखाचा दंड केला होता. पुन्हा शनिवारी २२ संस्थावर कारवाई करून पाच लाख ४४ हजार ७० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सध्या

जिल्हाभर जनावरे जगवण्यासाठी छावण्या सुरू केलेल्या आहेत. त्यात सुविधा देताना कुचराई केल्यावर कारवाई करण्याचा सातत्याने प्रशासन इशारा देत आहेत. तरीही छावण्या चालक संस्था सुविधा देण्यास टाळाटाळ करत असल्याचे पाहणी आढळून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी छावण्याची तपासणी मोहीम जोरदार सुरू केली असून, कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मागील काळात झालेल्या छावण्यांतील गैरव्यवहाराच्या पाश्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलली असल्याचे दिसत आहे. 

पशुखाद्याला दर्जा नाही  दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या सुरू केल्या आहेत. त्यात सरकारी नियमाप्रमाणे आणि प्रशासनाच्या तंबीमुळे पशुखाद्य दिले जात आहे. मात्र जनावरांनी दिले जाणारे पशुखाद्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. आपली जनावरे जगावायची आहेत. ओरड केली तर छावणी चालकांकडून त्रास होईल, यामुळे कोणी बोलत नसल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com