चिखलगावच्या जिनिंगमध्ये कापसाला भीषण आग; कोट्यवधीचे नुकसान

येथील पातूर मार्गावर चिखलगाव जवळ असलेल्या सम्यक जिनिंग व प्रेसिंगमध्ये मंगळवारी (ता.२६) पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांचा कापूस जळाला.
jining
jining

अकोला ः येथील पातूर मार्गावर चिखलगाव जवळ असलेल्या सम्यक जिनिंग व प्रेसिंगमध्ये मंगळवारी (ता.२६) पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांचा कापूस जळाला. शिवाय मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. तीन तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. याठिकाणी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र आहे. आग लागली तेव्हा ४५ मजूर कामावर होते. सुदैवाने जीवितहानी टळली. सम्यक जिनिंग प्रेसिंगमध्ये ४८ स्पीनमशीनवर काम सुरु होते. कापूसवाहक पट्ट्यावर कापसातील दगडामुळे स्पार्किंग झाले असावे आणि त्यातूनच सदर आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या आगीत सुमारे चार हजार क्विंटल कापूस, दोन हजार क्विंटल सरकी आणि कापसाच्या काही गाठी आगीत नष्ट झाल्या. माहिती मिळताच जिनिंग व्यवस्थापक भारती इंगळे,  जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे तसेच सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. ही आग विझवण्यासाठी अकोला महापालिकेचे दोन व पातुर नगर पालिकेचा एक बंब वापरण्यात आले. या ठिकाणी सीसीआयची कापूस खरेदी केली जात होती. आगीमुळे हे केंद्र तुर्त आता बंद झाले आहे. याचा फटका साहजिकच शेतकऱ्यांनाही बसणार आहे. आगीमुळे जिनिंग-प्रेसिंगच्या फॅक्टरीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.  सहकारी तत्त्वावरील ही जिनिंग प्रेसिंग अकोला जिल्ह्यातील मोठे युनिट आहे. याठिकाणी दहा ते अकरा हजार क्विंटलपेक्षा अधिक शेतकऱ्याच्या कापसाची खरेदी करण्यात आलेली आहे. आगीच्या घटनेमुळे येथील खरेदी थांबविण्यात आली आहे. या केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आता तातडीने दुसरे केंद्र उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. माहिती मिळताच अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही भेट देऊन पाहणी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com