नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
ताज्या घडामोडी
माळढोक पक्षी अभयारण्यात आग, २५ हेक्टरवरील क्षेत्राला झळ
सोलापूर : नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील माळढोक पक्षी अभयारण्यात पुन्हा एकदा आगीचा प्रकार घडला आहे. आगीची झळ सुमारे पंचवीस ते तीस हेक्टर क्षेत्राला बसली. या वर्षातील आगीची ही चौथी घटना आहे.
सोलापूर : नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील माळढोक पक्षी अभयारण्यात पुन्हा एकदा आगीचा प्रकार घडला आहे. आगीची झळ सुमारे पंचवीस ते तीस हेक्टर क्षेत्राला बसली. या वर्षातील आगीची ही चौथी घटना आहे. नान्नजमधील दुर्मिळ अशा माळढोक पक्षी अभयारण्यात रविवारी (ता. ७) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारासही घटना उघडकीस आली.
अकोलेकाटी ते कारंबा मार्डी कडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी आग लागली. यामध्ये सुमारे वीस ते पंचवीस हेक्टर माळरानावरील संपूर्ण गवत जळून खाक झाले. त्याच बरोबर कडुनिंब, बाभूळ, आपटा व इतर झाडे आगीमुळे होरपळली आहेत. कारंबा हद्दीहून ही आग माळरानावरील वाळलेल्या गवताकडे सर्वत्र पसरत गेली.
ही बाब वनमजूर यांच्या निदर्शनास आल्यावर कर्मचारी, वन अधिकारी व अभयारण्यास शेजारील शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तोपर्यंत २५ हेक्टरहून अधिक क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान, ही आग अभयारण्य क्षेत्रातून गेलेल्या विजेच्या तारांच्या शॅार्ट सर्किटमधून लागल्याचे सांगण्यात येते.
- 1 of 1096
- ››