agriculture news in Marathi firm on give free electricity till 100 unit Maharashtra | Agrowon

शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्यावर ठाम ः ऊर्जामंत्री राऊत

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

महिन्याला १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना मोफत वीज देण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी (ता. २०) केले.

मुंबई : महिन्याला १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना मोफत वीज देण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी (ता. २०) केले.

१०० युनिट वीज वापराला बिल न आकारण्याची घोषणा केली, तेव्हा आपल्याला महावितरणच्या ५९ हजार कोटी रुपयांच्या थकबाकीची कल्पना नव्हती. तथापि, राज्य कोरोनामुक्त झाल्यानंतर १०० युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात येईल. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी वार्षिक सहा हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कृषी पंपविषयक धोरणाला मान्यता देण्यात आली. या धोरणाची माहिती पत्रकार परिषदेत देताना राऊत आपल्या घोषणेचा पुनरुच्चार केला. १०० युनिटपर्यंत वीज वापरावर बिल न आकारण्याचा निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र कोरोनामुळे या समितीची बैठक होऊ शकली नाही. त्यातच भाजप सरकारच्या कार्यकाळात महावितरणची थकबाकी ५९ हजार कोटींवर पोहोचली. भाजपने 
केलेले हे पाप धुतल्यानंतर आपण मोफत विजेचा निर्णय घेऊ, असे राऊत यांनी सांगितले.

‘‘भाजप सरकारच्या कार्यकाळात महावितरणवरील थकबाकीचा बोजा ५९ हजार १४९ कोटींपर्यंत गेल्याबद्दल राज्‍य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या थकबाकीबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत,’’ अशी माहिती राऊत यांनी दिली.

दरम्यान, वाढीव वीजबिलात सवलत देण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडणाऱ्या भाजपवर नितीन राऊत यांनी टीका केली. भाजपला आंदोलन करायचे असेल तर त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात करावे. कारण वाढीव वीजबिलातून दिलासा देण्यासाठी आपण केंद्राला पत्र लिहून १० हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली होती. केंद्राने हे अनुदान दिले नाही. राज्याच्या हक्काचे जीएसटीचे २८ हजार कोटी रुपयेही अजून दिलेले नाहीत. अद्यापही दिलेले नाहीत, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.

भाजप नेत्यांना आव्हान
आतापर्यंत ६९ टक्‍के वीजग्राहकांनी आपली बिले भरली आहेत. उर्वरित ३१ टक्‍के ग्राहक येत्‍या डिसेंबर, जानेवारीपर्यंत बिले भरतील. भाजप नेत्‍यांना जर वाढीव बिलांबाबत आक्षेप असेल, तर त्‍यांनी ती बिले माझ्याकडे द्यावीत. मी त्‍या बिलांची तपासणी करेन. बिल चुकीचे असेल तर दुरुस्त केले जाईल. जर बिल वाढीव नसल्याचे सिद्ध झाले, तर भाजप नेत्यांनी ती बिले भरावीत, असे आव्हान राऊत यांनी दिले. वीजबिलांवरून राजकारण न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...