Agriculture news in Marathi The first box of hapus mango departs for Kolhapur | Agrowon

हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला रवाना

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 जानेवारी 2020

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण) येथील आंबा बागायतदार सूर्यकांत ऊर्फ आबा फोंडेकर यांच्या बागेतून हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला रवाना झाली आहे. चार डझन आंब्याच्या या पेटीला साधारणपणे ९ हजार रुपये दर मिळणार आहे. श्री. फोंडेकर यांच्या आंबा बागेला सप्टेंबरअखेरपासून मोहोर येण्यास प्रारंभ झाला होता. गेल्या वर्षीदेखील जिल्ह्यातून आंब्याची पहिली पेटी पाठविण्याचा मान त्यांनीच मिळविला होता.

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण) येथील आंबा बागायतदार सूर्यकांत ऊर्फ आबा फोंडेकर यांच्या बागेतून हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला रवाना झाली आहे. चार डझन आंब्याच्या या पेटीला साधारणपणे ९ हजार रुपये दर मिळणार आहे. श्री. फोंडेकर यांच्या आंबा बागेला सप्टेंबरअखेरपासून मोहोर येण्यास प्रारंभ झाला होता. गेल्या वर्षीदेखील जिल्ह्यातून आंब्याची पहिली पेटी पाठविण्याचा मान त्यांनीच मिळविला होता.

लांबलेला पाऊस, क्यार वादळाचे दुष्परिणाम आणि नोव्हेंबर उजाडेपर्यंत थंडीचा नसलेला पत्ता यामुळे या वर्षीचा आंबा हंगाम लांबणीवर पडणार हे निश्‍चित मानले गेले होते. मात्र, मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथे सूर्यकांत ऊर्फ आबा फोंडेकर यांच्या आंबा बागेतून चार डझनची पहिली पेटी कोल्हापूर बाजारपेठेत रवाना झाली. चार डझनच्या पेटीला ९ हजार रुपयांचा दर मिळणार आहे.

श्री. फोंडेकर यांच्या तीन आंबा बागा असून एका बागेत १२५, दुसऱ्या बागेत ३२ तर तिसऱ्या बागेत २२५ झाडे आहेत. यातील पहिल्या आणि दुसऱ्या बागेतील १५७ झाडांपैकी चार पाच झाडांचा अपवाद वगळता इतर झाडांना २५ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने मोहोर येऊ लागला. ऑक्टोबरमध्ये अनेक झाडे मोहोरली. परंतु दिवाळीत सलग चार ते पाच दिवस सलग पाऊस झाला. या पावसात मोहोरलेल्या बागांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर त्यांनी बागांची विशेष काळाजी घेत विविध कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आमच्या बागेतून पहिली पेटी मार्केटमध्ये पोचली होती. या वर्षी पहिली पेटी २१ जानेवारीला रवाना झाली आहे. बहुतांशी आंबा कलमे मोहोरलेली असताना सलग चार ते पाच दिवस पाऊस झाला. त्याचा मोठा दुष्परिणाम फळांच्या आकारावर झाला आहे. चार ते पाच प्रकारात आंब्याची फळे येताना दिसत आहेत. आंब्याची मोजकी झाडे असल्यास पावसाची शक्यता असल्यास झाडे झाकून ठेवता येतात. परंतु झाडांचे प्रमाण अधिक असल्यास हा पर्याय शक्य होत नाही. पहिली पेटी चार डझनची असून त्याला साधारणपणे नऊ हजार रुपये दर मिळेल. दुसरी तोडणी वीस दिवसांनी केली जाणार आहे.
- सूर्यकांत फोंडेकर, आंबा बागायतदार, कुंभारमाठ, ता, मालवण


इतर बाजारभाव बातम्या
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...
कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली, दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते...परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ३०० ते ३५००...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
जळगावात गवार १८०० ते ३८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
कोल्हापुरात गवार दहा किलोस २०० ते ५००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरला ज्वारीच्या आवकेत वाढनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
फ्लॉवर, गाजर, भेंडी, कोबी, वांग्याच्या...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
डाळिंबाची आवक घटली, मागणी नसल्याने दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुण्यात हिरवी मिरची, मटारच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १६०० ते २०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी २५०० ते ३००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...