उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणार

नियोजनानुसार धरणातून मुख्य कालवा, भीमा- सीना जोड कालवा (बोगदा), सीना- माढा सिंचन योजना व दहिगाव- करमाळा उपसा सिंचन योजना यामधून खरीप हंगामासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली आहे.
The first cycle for kharif will be released from Ujjain
The first cycle for kharif will be released from Ujjain

सोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा ५० टक्केवर पोचलेला आहे. त्यामुळे नियोजनानुसार धरणातून मुख्य कालवा, भीमा- सीना जोड कालवा (बोगदा), सीना- माढा सिंचन योजना व दहिगाव- करमाळा उपसा सिंचन योजना यामधून खरीप हंगामासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच हे पाणी सोडण्यात येणार आहे. 

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी यासंबंधी मंत्री पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार ही मान्यता मिळाली. जिल्ह्यात अद्यापपर्यंत सरासरीएवढा पाऊस झालेला नाही. जलसंपदा विभाग आणि धरण लवादाच्या नियमानुसार धरण प्रकल्पात ३० टक्केपेक्षा जास्त पाणी झाल्यास व लाभक्षेत्रात काही प्रमाणात अवर्षणग्रस्त परिस्थिती असल्यास पाटबंधारे खात्याने शेतीसाठी पाणी सोडणे आवश्यक आहे. त्याच नियमानुसार उजनी धरण आता ५० टक्के झाले आहे. 

धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्गही सतत चालू असल्यामुळे कालवा, भीमा-सीना बोगद्यातून सीना नदीत, सीना - माढा सिंचन योजना व दहिगाव- करमाळा सिंचन योजना यातून खरीप हंगामातील आवर्तनाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली. त्याला मान्यताही मिळाल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.

असे सुटणार पाणी उजनी धरणाच्या मुख्य कालवा वीस किलोमीटर, डावा कालवा १२६ किलोमीटर व उजवा कालवा १२२ किलोमीटर तसेच भीमा सीना बोगद्यातून सीना नदीत व सीना माढा आणि दहिगाव या दोन्ही सिंचन योजनातून हे आवर्तन सोडण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी पाणीमागणी अर्ज भरून द्यावेत, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com