Agriculture news in Marathi The first cycle for kharif will be released from Ujjain | Agrowon

उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

नियोजनानुसार धरणातून मुख्य कालवा, भीमा- सीना जोड कालवा (बोगदा), सीना- माढा सिंचन योजना व दहिगाव- करमाळा उपसा सिंचन योजना यामधून खरीप हंगामासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली आहे.

सोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा ५० टक्केवर पोचलेला आहे. त्यामुळे नियोजनानुसार धरणातून मुख्य कालवा, भीमा- सीना जोड कालवा (बोगदा), सीना- माढा सिंचन योजना व दहिगाव- करमाळा उपसा सिंचन योजना यामधून खरीप हंगामासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच हे पाणी सोडण्यात येणार आहे. 

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी यासंबंधी मंत्री पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार ही मान्यता मिळाली. जिल्ह्यात अद्यापपर्यंत सरासरीएवढा पाऊस झालेला नाही. जलसंपदा विभाग आणि धरण लवादाच्या नियमानुसार धरण प्रकल्पात ३० टक्केपेक्षा जास्त पाणी झाल्यास व लाभक्षेत्रात काही प्रमाणात अवर्षणग्रस्त परिस्थिती असल्यास पाटबंधारे खात्याने शेतीसाठी पाणी सोडणे आवश्यक आहे. त्याच नियमानुसार उजनी धरण आता ५० टक्के झाले आहे. 

धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्गही सतत चालू असल्यामुळे कालवा, भीमा-सीना बोगद्यातून सीना नदीत, सीना - माढा सिंचन योजना व दहिगाव- करमाळा सिंचन योजना यातून खरीप हंगामातील आवर्तनाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली. त्याला मान्यताही मिळाल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.

असे सुटणार पाणी
उजनी धरणाच्या मुख्य कालवा वीस किलोमीटर, डावा कालवा १२६ किलोमीटर व उजवा कालवा १२२ किलोमीटर तसेच भीमा सीना बोगद्यातून सीना नदीत व सीना माढा आणि दहिगाव या दोन्ही सिंचन योजनातून हे आवर्तन सोडण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी पाणीमागणी अर्ज भरून द्यावेत, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले आहे.


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...