agriculture news in Marathi first day seven cotton procurement center opened Maharashtra | Agrowon

राज्यात पहिल्याच दिवशी सात केंद्रांवर खरेदी 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

कापूस उत्पादकांची नोंदणी करण्यात आली त्यासोबतच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतही सहकार्य करण्यात आल्याने यवतमाळ चंद्रपूर जिल्हयातील सात केंद्रावर कापूस खरेदीची सुरुवात सोमवार (ता.२०) पासून झाली.

नागपूर ः कापूस उत्पादकांची नोंदणी करण्यात आली त्यासोबतच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतही सहकार्य करण्यात आल्याने यवतमाळ चंद्रपूर जिल्हयातील सात केंद्रावर कापूस खरेदीची सुरुवात सोमवार (ता.२०) पासून झाली. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची ही केंद्र आहेत. नांदेड जिल्ह्यात दोन ठिकाणी पूर्वीपासूनच सीसीआयची खरेदी सुरु आहे. 

राज्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात ८० लाख क्‍विंटलपेक्षा अधिक कापूस शिल्लक आहे. त्यामुळे कापसाची खरेदी व्हावी, अशी मागणी होत होती. पणन विभागाकडून याची दखल घेत सोमवार (ता.२०) पासून खरेदी सुरु करण्याचे निर्देश सीसीआय व कापूस पणन महासंघाला दिले होते. राज्यात सुमारे ८५ केंद्रावर सीसीआयकडून तर ७४ केंद्राच्या माध्यमातून पणन महासंघ खरेदी करीत आहेत. 

दरम्यान, सोमवारी पणन महासंघाने यवतमाळ जिल्हयात चार तर चंद्रपूर जिल्हयात तीन याप्रमाणे सात केंद्रावर कापूस खरेदी सुरु केली. सीसीआयकडून यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यात नोंदणी करण्यात आली आहे. या ठिकाणी दररोज १० गाड्यांमधील कापसाची खरेदी होईल, असे सीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगीतले. 

राज्यात टप्प्याटप्यात खरेदीस सुरवात 
वाशीममध्ये मंगळवार (ता.२१) पासून खरेदी सुरु होण्याची शक्‍यता असल्याचे सीसीआयकडून सांगण्यात आले. नागपूरमधील कापूस खरेदीत काही तांत्रिक अडचणी असून त्या सोडविण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी देखील लवकरच खरेदी सुरु होईल, अशी माहिती सीसीआयकडून देण्यात आली. राज्यातही टप्याटप्याने खरेदीची सुरुवात होणार आहे. सीसीआयकडून यापूर्वीच नांदेड जिल्हयातील दोन केंद्रावर खरेदी केली जात आहे. 


इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...