औरंगाबादेत गटशेती संघाचे पहिले विभागीय कार्यालय सुरू

गटशेती संघाचे पहिले विभागीय कार्यालय सुरू
गटशेती संघाचे पहिले विभागीय कार्यालय सुरू

औरंगाबाद : ‘शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्वयंप्रेरणेने चालविलेली शेती चळवळ’ हे बिरुद घेऊन अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे कामकाज सुरू आहे. गटशेतीतील शेतकऱ्यांना शहरी भागात मार्केटिंग सोबतच, शिक्षण, संशोधन, गटशेती विस्तार, फळे, रोपे, प्रक्रिया उद्योग याविषयी सहकार्य व्हावे, या उद्देशाने अॅग्रोव्‍हिजन गटशेती संघाने शहरी भागातही आपली पाळेमुळे रोवणे सुरू केले आहे. त्यासाठी राज्यातील पहिल्या गटशेती कार्यालयाची शेतकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ९) औरंगाबादेत सुरवात केली.

औरंगाबादमधील जवाहरनगर पोलिस स्टेशनजवळ विभागीय कार्यालयाच्या सुरवातप्रसंगी सीताफळ महासंघाचे राज्य अध्यक्ष श्‍याम गट्टाणी, उपाध्यक्ष एकनाथ आगे, आकाशवाणी पुणेचे सहसंचालक साहेबराव सोनवणे, अन्नदाता शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी, मोसंबी उत्पादक संघाचे राज्य अध्यक्ष भगवानराव डोंगरे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. एस. बी. पवार, उपविभागीय कृषी अधिकारी अनिलकुमार हतगावकर, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, आंबा उत्पादक संघाचे राज्य सचिव ॲड. वसंत देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे, भाऊसाहेब थोरात, डॉ. किशोर उढाण, ॲड. सा. मा. पंडित, कृषिभूषण नंदकिशोर काबरा सतिश महानोर, औषधी संघटनेचे जिल्हा सदस्य बाबुराव सोनवणे, अंबादास सोनवणे, प्रा. प्रणिता मुळे, गणेश बुरकुल, महेश गट्टाणी, अविनाश जोशी, रवींद्र फुरसुले आदींसह, औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे प्रमुख संजय मोरे पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्‍वितेसाठी हरीश मोरे, विष्णू गाडेकर, बबन थुट्टे, संकेत मोरे, डॉ. हर्षल मोरे, स्वराज मोरे, संदेश मोरे, तुषार फदाट, अनंता पवार, रोहन गीते, करणसिंग कायटे, ज्ञानेश्वर शेंद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com