agriculture news in marathi First Hindkesari and renowned wrestler Shripat Khancnale Passes aways | Page 2 ||| Agrowon

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 डिसेंबर 2020

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय ८६ ) यांचे सोमवारी(ता.१४) पहाटे निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. सोमवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोल्हापूर : पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय ८६ ) यांचे सोमवारी(ता.१४) पहाटे निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. सोमवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्री. खंचनाळे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे ते तीन दिवस उपचार घेत होते. प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना महावीर महाविद्यालयाच्या परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

खंचनाळे यांच्या निधनाचे वृत्त कळताच कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त झाली. पैलवानांनी खासगी रुग्णालयाकडे धाव घेतली. पै. खंचनाळे यांचं राज्यातील अनेक मल्ल घडवण्यात मोठं योगदान आहे. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांचे निधन झाल्याचे समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हिंदकेसरी जिंकत महाराष्ट्राची मान उंचावली!
श्री. खंचनाळे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा येथील. त्यांनी १९५९ ला पंजाब केसरी बनता सिंग याला पराभूत करत हिंदकेसरी गदा मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. याच वर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटांत अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्यांनी १९५८, १९६२ व १९६५ ला झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धाही जिंकल्या. त्यांनी महाराष्ट्र केसरी, ऑल इंडिया चॅम्पियनसारख्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. हिंदकेसरी जिंकत कुस्ती क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळवत महाराष्ट्राची मान उंचावली.

शोक संदेश..
कुस्ती ही लढवय्या महाराष्ट्राची शान आहे. मातीतल्या या खेळावर श्रीपती खंचनाळे यांनी पहिला हिंदकेसरी किताब पटकावून महाराष्ट्राचे नाव कोरले. त्यांच्या निधनामुळे अनेक हिंदकेसरींचे आणि होतकरू कुस्तीगीर पैलवानांचे वस्ताद म्हणजे मार्गदर्शक छत्र हरपले आहे.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाने राज्याच्या कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. 
- उपमुख्यमंत्री अजित पवार


इतर ताज्या घडामोडी
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...