‘मकाई’कडून पहिल्या हप्त्यापोटी २२०० रुपये जमा ः बागल

सोलापूर : भिलारवाडी (ता. करमाळा) येथील मकाई सहकारी साखर कारखान्याने या वर्षीच्या गाळप हंगामातील उसाला पहिल्या हप्त्यापोटी २२०० रुपये बँक खात्यात जमा केले आहेत.
  In the first installment from ‘Maize’ Deposit of Rs. 2200: Bagal
In the first installment from ‘Maize’ Deposit of Rs. 2200: Bagal

सोलापूर : भिलारवाडी (ता. करमाळा) येथील मकाई सहकारी साखर कारखान्याने या वर्षीच्या गाळप हंगामातील उसाला पहिल्या हप्त्यापोटी २२०० रुपये बँक खात्यात जमा केले आहेत. शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस घालून कारखान्याला सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी केले. 

बागल म्हणाले, ‘‘आर्थिक अडचणीमुळे कारखाना गतवर्षी बंद होता. यंदाही कोरोनामुळे अडचणी होत्या. पण, त्यातूनही कारखान्याला परवाना मिळवून यंदाचा हंगाम सुरु केला. कारखान्याने अनेक अडचणीवर मात करून उसाला चांगला दर देण्याचे ठरवले आहे. दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही तो पाळत आहोत. कामगारांच्या पगाराचाही विषय आहे. त्याबाबतही लवकरच तोडगा काढू. पण, सध्या शेतकऱ्यांनी ऊस घालून कारखान्यावर जो विश्वास दाखवला आहे. तो मोठा आहे. यापुढेही शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस घालून सहकार्य करावे. जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देण्याचा आपला प्रयत्न आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com