agriculture news in Marathi first installment of prime minister garib kalyan scheme Maharashtra | Agrowon

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 एप्रिल 2020

पंतप्रधान​ गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या सर्व महिलांच्या बचत खात्यावर एप्रिल ते जून २०२० पर्यंत तीन महिन्यासाठी प्रति महिना ५०० रुपये प्रमाणे प्रत्येकी एकूण रक्कम १ हजार ५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत.

मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली आर्थिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेता केंद्र शासनामार्फत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या सर्व महिलांच्या बचत खात्यावर एप्रिल ते जून २०२० पर्यंत तीन महिन्यासाठी प्रति महिना ५०० रुपये प्रमाणे प्रत्येकी एकूण रक्कम १ हजार ५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. यानुसार माहे एप्रिल २०२० ची आर्थिक रक्कम प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या महिलांच्या बचत खात्यावर जमा करण्यात आली आहे. 

तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम २ हजार रुपये थेट हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी ही माहिती दिली. 

कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही याची खबरदारी म्हणून केंद्र शासनाने सर्व बँक शाखा, बँक ग्राहक सेवा केंद्र, बीसी पॉइंट, एटीएम इत्यादी ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता या योजनेची रक्कम काढण्यासाठी जनधन खाते क्रमांकाच्या शेवटचा एक अंकनिहाय तारीख ठरवून दिली आहे. त्यानुसार या बचत खात्यातून त्या त्या दिवशी किंवा ९ एप्रिल २०२० नंतर केव्हाही (सुट्टीचा वार वगळून) पैसे काढता येणार आहेत. स्वयंसहायता समूहातील महिला सदस्यांनी व इतर महिलांनी गर्दी न करता आपल्या आवश्यकतेनुसार पैसे काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

खातेधारक महिलेच्या जनधन खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकाप्रमाणे रक्कम काढण्यासाठी पुढील प्रमाणे तारखा देण्यात आल्या आहेत. खाते क्रमांकातील शेवटचा अंक ० ते १ (३ एप्रिल), २ ते ३ (४ एप्रिल), ४ ते ५ (७ एप्रिल), ६ ते ७ (८ एप्रिल), ८ ते ९ (९ एप्रिल). 

उमेद अभियानस्तरावरुन सर्व महिलांना या योजनेविषयी गावस्तरावर माहिती देण्यात येत असून जागरूक करण्यात येत आहे. यासाठी अभियानाअंतर्गत निवड केलेल्या ४ हजार ५०० बँक सखी, आर्थिक साक्षरता सखी तसेच इतर सखी यांची याबाबत मदत घेण्यात येत आहे. तसेच व्यवसाय प्रतिनिधीच्या साहाय्याने गरोदर, आजारी, अपंग व वृध्द महिलांना थेट घरपोच रक्कम अदा करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही याची खबरदारी म्हणून समूहातील सदस्य महिला आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहेत. तसेच याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे, अशी माहिती आर. विमला यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...