वंचित बहुजन आघाडीच्या २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीच्या २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
वंचित बहुजन आघाडीच्या २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई ः वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी आघाडीच्या २२ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरमधून डॉ. आनंद गुरव, दक्षिण कोल्हापुरातून बबनराव ऊर्फ दिलीप पांडुरंग कावडे, तर कराड दक्षिणमधून बाळकृष्ण शंकर देसाई यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे.

उमेदवारांच्या नावाची घोषणा करताना वंचितने उमेदवारांसमोर त्यांच्या जातीचा उल्लेख केला आहे. आपण विधानसभा निवडणूक रिंगणात वंचित समाजातील दुर्बल, अल्प लोकसंख्येच्या अलुतेदार, बलुतेदारांना उतरविल्याचे आंबेडकर यांनी या वेळी सांगितले. 

लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही वंचित आणि एमआयएमध्ये आघाडी व्हावी, असे प्रयत्न सुरू आहेत. मात्र एमआयएम पाठोपाठ ‘वंचित’नेही आपले उमेदवार जाहीर करायला सुरवात केल्याने दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे. दरम्यान, वंचित आघाडीचे राष्ट्रीय सचिव गोपीचंद पडळकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. या संदर्भात विचारले असता आंबेडकर यांनी ही चर्चा फेटाळून लावत पडळकर हे आघाडीसोबत असल्याचा दावा केला.

वंचितने जाहीर केलेले उमेदवार आणि कंसात विधानसभा मतदारसंघ - सुरेश जाधव (शिराळा), डॉ. बाळासाहेब चव्हाण (कोरेगाव), दीपक नारायण शामदिरे (कोथरूड), अनिल शंकर कुऱ्हाडे (शिवाजीनगर), मिलिंद काची (कसबापेठ), शहानवाला जब्बार शेख (भोसरी), शाकीर इसालाल तांबोळी (इस्लामपूर), किसन चव्हाण (पाथर्डी-शेवगाव), अरूण जाधव (कर्जत-जामखेड) सुधीर शंकरराव पोतदार (औसा), चंदुलाल वकटुजी मेश्राम (ब्रह्मपुरी), अरविंद सांडेकर (चिमूर), माधव कोहळे (राळेगाव), शेख शफी अब्दुल नबी शेख (जळगाव), लालसू नागोटी (अहेरी), मणियार राजासाब (लातूर शहर), नंदकिशोर कुयटे (मोर्शी), अॅड. अमोद बावने (वरोरा), अशोक विजय गायकवाड (कोपरगाव).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com