Agriculture news in marathi The first phase of crop loss to Warhad is Rs 265 crore | Agrowon

वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा पहिला टप्पा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका बसलेल्या पीक नुकसानीचा मोबदला म्हणून वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांसाठी २६५ कोटींचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या निधीचे तातडीने वाटप करण्याचे निर्देश तालुका यंत्रणांना देण्यात आले आहेत.

मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप हंगामाचे मोठे नुकसान केले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महाचक्री वादळांमुळेही मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत साडेनऊ लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. यात सर्वाधिक बुलडाणा जिल्ह्यात नुकसान झालेले आहे. 

अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका बसलेल्या पीक नुकसानीचा मोबदला म्हणून वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांसाठी २६५ कोटींचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या निधीचे तातडीने वाटप करण्याचे निर्देश तालुका यंत्रणांना देण्यात आले आहेत.

मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप हंगामाचे मोठे नुकसान केले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महाचक्री वादळांमुळेही मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत साडेनऊ लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. यात सर्वाधिक बुलडाणा जिल्ह्यात नुकसान झालेले आहे. 

मंगळवारी राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार पहिल्या टप्प्याचा निधी जिल्ह्याला आला आहे. बुलडाणा जिल्ह्यासाठी १३६ कोटी १३ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. अकोल्याला ७२.५५ कोटी, तर वाशीम जिल्ह्याला ५६ कोटी रुपये ५१ लाख २० हजार रुपये आले आहेत. सदर मदत ही शेती पीक व फळपिके यांच्यासाठी दोन हेक्टर मर्यादेपर्यंत दिली जाणार आहे. पिकांसाठी हेक्टरी ८ हजार रुपये व बहुवार्षिक (फळपिके) यांच्या नुकसानीसाठी १८ हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे. तसेच जमीन महसुलात सूट व शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी ही सवलतदेखील जाहीर करण्यात आली आहे.

नुकसानीच्या या कालावधीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून शासनाला निधी मागण्यात आला होता. या मागणीनुसार शासन स्तरावरून जिल्ह्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे. 

अकोला जिल्ह्यात झालेले नुकसान, अपेक्षित मदत

 जिरायती क्षेत्र ः जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार ६९.४१ हेक्टरवरील जिरायती (कोरडवाहू) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले. सदर नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी २९२ कोटी ५ लाख ५५ हजार २८० रुपयांची मदत अपेक्षित आहे. 

 बागायती क्षेत्र ः अतिवृष्टीमुळे २ हजार ४८२.२४ हेक्टरवरील बागायती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या क्षेत्रासाठी १ कोटी ९८ लाख ५७ हजार ९२० रुपये मदत हवी आहे. 

फळबाग ः फळबागांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत जाहीर केल्यामुळे जिल्ह्यातील २३२ शेतकऱ्यांना ३ कोटी ९० लाख १६ हजार ८०० रुपयांची मदत मिळेल.
 


इतर ताज्या घडामोडी
'तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ व्हावे...गेल्या पाच-दहा वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी...
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...