Agriculture News in Marathi The first phase of e-crop survey was successful | Page 2 ||| Agrowon

ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या पहिल्या वर्षाचा टप्पा महाराष्ट्राने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. राज्यातील ५८.३९ लाख शेतकऱ्यांनी ७० लाख हेक्टरवरील ३८४ पिकांची ई-पीक पाहणी केली आहे.

पुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या पहिल्या वर्षाचा टप्पा महाराष्ट्राने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. राज्यातील ५८.३९ लाख शेतकऱ्यांनी ७० लाख हेक्टरवरील ३८४ पिकांची ई-पीक पाहणी केली आहे. सर्वाधिक नोंदणी सोयाबीनची झाली असून क्षेत्र नोंदणीत सर्व जिल्ह्यांमध्ये जळगावने आघाडी घेतली आहे. राज्याचे जमाबंदी आयुक्त नि. कु. सुधांशू यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे आव्हान पेलून दाखविले आहे. त्यासाठी उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी राज्यस्तरीय समन्वयाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली आहे.

ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे गेल्या खरिपात केलेल्या कामकाजाचा संख्यात्मक अहवाल तयार झालेला आहे. त्यानुसार या पाहणीत ५८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भाग घेतला. त्यासाठी ३४ लाखांहून जास्त भ्रमणध्वनींचा (स्मार्टफोन) वापर शेतकऱ्यांनी केला आहे. सर्वात जास्त स्मार्टफोनचा वापर औरंगाबाद विभागात (८.७३ लाख) तर सर्वात कमी वापर कोकण विभागात (१.१६ लाख) केला गेला आहे.

विभागनिहाय कामकाज बघता नागपूर विभागाने ई-पीक पाहणीत बाजी मारली आहे. तेथे ९.८६ लाख शेतकऱ्यांनी पाहणी करून १३.५४ लाख हेक्टरवरील २९९ पिकांची नोंदणी केली. या विभागात एकूण १९.२७ लाख हेक्टरवर पिके होती. म्हणजेच या विभागाने ७०.२६ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नोंद ई-पीक पाहणी प्रकल्पाद्वारे पूर्ण केली आहे.

प्रतिक्रिया

ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या माध्यमातून ‘माझा शेतकरी माझा सातबारा- मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ अशी संकल्पना शेतकऱ्यांसमोर मांडली होती. तिचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. हा  केवळ पीक नोंदणीचा नसून, शेतकऱ्यांना सरकारी कामकाजात सामावून घेणारा आणि अधिकाराचे स्वातंत्र्य देणारा आदर्श उपक्रम ठरला आहे. त्याचे श्रेय सरकारी कर्मचारी, शेतकरी आणि धोरणकर्त्या लोकप्रतिनिधींना जाते.
-रामदास जगताप, राज्य समन्वयक, 
ई-पीक पाहणी प्रकल्प, जमाबंदी आयुक्तालय

ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वी
अशी ठरली पहिल्या 
ई-पीक पाहणीचे वैशिष्ट्ये

    ई-पीक पाहणीसाठी नोंदणी करणारे खातेदारः ५८,३९,८०४
    नोंदणी करूनही पीक पाहणी न करणारे खातेदारः २३,६३,९८८
    खरिपाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्रः १४९ लाख ७३ हजार हेक्टर
    त्यापैकी ई-पीक पाहणी झालेले क्षेत्रः ६२,८२,४९४ हेक्टर
    ई-पीक पाहणीत सर्वाधिक क्षेत्र नोंदविणारे जिल्हेः प्रथम जळगाव (४.८९ लाख हेक्टर), द्वितीय अमरावती (४.२६ लाख हेक्टर), तृतीय यवतमाळ (३.९४ लाख हेक्टर)
    ई-पीक पाहणीत शंभर टक्के नोंदणी केलेले जिल्हे ः गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर 
    सर्वाधिक पिके नोंदविणारे जिल्हेः प्रथम नाशिक (पीक संख्या ३८४), द्वितीय नगर (३७२) आणि तृतीय पुणे (३७०)
    सर्वाधिक नोंदणी झालेली पिकेः प्रथम सोयाबीन (२४.३४ लाख हेक्टर), द्वितीय कापूस (१५.९४ लाख हेक्टर), तृतीय भात (९.३९ लाख हेक्टर)


इतर बातम्या
खराब झालेल्या सोलर  पॅनेलची नुकसान...गडचिरोली : धानोरा तालुक्यातील गिरोला येथील सुरेश...
रब्बी हंगामात ज्वारी घटली; हरभऱ्याची...पुणे : राज्यात रब्बीच्या ९८ टक्के पेरा पूर्ण झाला...
डिजिटल सात-बारा प्रकल्पातून जगताप यांची...पुणेः देशात चर्चित ठरलेल्या डिजिटल सात-बारा...
बाजारात तूर आवक वाढली; दरातही सुधारणा पुणेः देशातील बाजारांमध्ये तुरीची आवक वाढली आहे....
बाजारपेठेत नव्या बेदाण्याची प्रतीक्षा सांगली ः गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याला...
पुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे...पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस...
ऊसतोडणी रखडल्याने वैभववाडी, उंबर्डेत...सिंधुदुर्गनगरी ः वैभववाडी तालुक्यातील नादुरूस्त...
साताऱ्यात कृषिपंपांची वीज तोडणीचा धडाकासातारा : गेल्या १५ दिवसांपासून ग्रामीण भागात...
वंध्यत्व निवारण शिबिरातून दूध...नागपूर : ‘‘विदर्भ व मराठवाडा दूध विकास...
नाशिकच्या स्वयंम पाटील यास प्रधानमंत्री... नाशिक: जिल्ह्यातील स्वयंम पाटील याने क्रिडा...
वीजतोडणीमुळे शेतकरी संतप्त भंडारा : निवडणुकीचे निकाल लागताच सरकारने भंडारा...
‘महाबीज’चा सोयाबीन बियाणे देण्यास नकारसांगली ः खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची कमतरता...
वीजपुरवठा सुरळीत करा; ‘बळिराजा’ची मागणीजालना : महावितरणने शेतकऱ्यांकडे थकबाकी दाखवून...
औरंगाबादमध्ये भूसंपादन मोबदल्यासाठी...औरंगाबाद : निम्न दुधना प्रकल्पाचा जलसाठा ५० टक्के...
बासमतीची निर्यात वाढण्याची शक्यता इराण आणि सौदी अरेबियाकडून होणारी बासमती तांदळाची...
राज्यात थंडीची लाट पसरणार :...पुणे : पाकिस्तान मार्गे देशाच्या पश्चिम...
गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात ५३...आर्थिक उदारीकरणानंतर (Economic liberalization)...
आंबा, काजू हंगाम उशिरा सुरू होण्याचा...  वृत्तसेवा - गेल्या आठवड्याच्या शेवटी...
अन् शेतकऱ्याच्या हातात उरतं फक्त पाचटउसाला तुरा लागणं याला शेतकरी उसाचं वय झालं असं...
केंद्र सरकारकडून ६०६.१९ लाख टन...केंद्र सरकारने २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात एकूण...