मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त 

यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक शेतकऱ्यांना साधणार होता. कपाशीच्या झाडांवर बोंड सुद्धा परिपक्व झाले होते.
cotton
cotton

अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक शेतकऱ्यांना साधणार होता. कपाशीच्या झाडांवर बोंड सुद्धा परिपक्व झाले होते. मात्र, दरम्यानच्या काळात संततधार पाऊस झाल्याने परिपक्व झालेले बोंड काळे पडले असून काही ठिकाणी कुजलेही. काही शेतकऱ्यांनी काळे पडलेले बोंड तोडून त्यातून कापूस काढण्याचा प्रयत्न सुरु केला. मुहूर्ताचा हा पहिला संपूर्ण कापूस कवडीयुक्त निघत आहे. 

जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागवड झालेले कपाशीचे पीक चार महिने कालावधीचे झाले आहे. प्रत्येक प्लॉटमध्ये झाडांवर बोंड्या परिपक्व झाल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात कापूस वेचणीचा शुभारंभ करावा लागणार अशी चिन्हे होती. परंतु गेल्या आठवड्यात झालेल्या सलग व संततधार पावसामुळे कापूस उत्पादकांचे नियोजन बिघडले आहे. वेचणीला येणाऱ्या कापसाची कवडी झाली. प्रत्येक झाडावर पहिल्या टप्प्यात लागलेली बोंड काळवंडलेली आहेत. जमिनीला लागून असलेले बोंड तर पाऊस व आर्द्रतेमुळे कुजले. त्यावर बुरशी तयार झाली. 

मोठे नुकसान  शेतकऱ्यांनी काळवंडलेले मात्र कडक असलेले बोंड तोडून घरी आणले. हे बोंड वाळवून त्यातून कापूस काढण्याचे काम केले जात आहे. हा संपूर्ण कापूस कवडीयुक्त निघत आहे. पहिल्या काही वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. याच कापसाला चांगला भाव मिळतो. यंदा पहिल्या वेचणीचा कापसाची अशी विचित्र स्थिती बनली आहे. यामुळे मोठे नुकसान कापूस उत्पादकांनाही सहन करावे लागणार आहे.  प्रतिक्रिया  मी यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात दोन एकरात कपाशीची लागवड केली होती. पीक चांगले बहरले होते. झाडांवर कैऱ्या मोठ्या संख्येने लागलेल्या होत्या. परंतु आत्ताच्या पावसाने सर्व बोंड्या काळ्या पडल्या. आम्ही बोंड तोडून घरी आणले व ते वाळवून कापूस काढत आहोत. त्यातून कवडीचा कापूस निघत आहे.  - क्रांतीकुमार टोहरे, शेतकरी, बेलखेड, ता. तेल्हारा जि. अकोला     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com