शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
ताज्या घडामोडी
रब्बीसाठी पहिले आवर्तन पाच डिसेंबरला ः पाटील
जळगाव : ‘‘रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. पहिले आवर्तन ५ डिसेंबरला सोडण्यात येईल,’’ अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
जळगाव : ‘‘रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. पहिले आवर्तन ५ डिसेंबरला सोडण्यात येईल,’’ अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
अजिंठा विश्रामगृहात गिरणा कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
आमदार चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता आनंद मोरे, गिरणा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एम. एस. आमले, कार्यकारी अभियंता धर्मेद्रकुमार बेहरे, सल्लागार समितीचे सदस्य प्रशांत पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, दत्तु ठाकूर, पाचोरा, भडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी, मालेगाव महानगरपालिका, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, धुळे व नाशिक, अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी यांचेसह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गिरणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या तीन आवर्तनामुळे रब्बी हंगामास मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
- 1 of 1021
- ››