agriculture news in marathi The first rotation of 'Isapur' from Friday | Agrowon

‘इसापूर’चे पहिले आवर्तन शुक्रवारपासून

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

नांदेड : ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूरमधून रब्बीसाठी प्रथम पाणीपाळी २७ नोव्हेंबर रोजी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नांदेड : ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूरमधून रब्बीसाठी प्रथम पाणीपाळी २७ नोव्हेंबर रोजी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामातील उर्वरित दोन पाणीपाळ्या व उन्हाळी हंगामातील चार पाणीपाळ्याचे नियोजन आचारसंहिता संपल्यानंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरणार आहे’’, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूरमधून रब्बी व उन्हाळी हंगाम २०२० -२१ मधील उपलब्ध साठ्यानुसार पाणीपाळ्याच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांच्या अध्यक्षतेखाली १९ नोव्हेंबर रोजी कालवा सल्लागार समितीच्या सर्व शासकीय सदस्यांची बैठक दृकश्राव्य माध्यमाद्वारे (VC) झाली. 

या बैठकीमध्ये सिंचनासाठी रब्बी हंगाम सन २०२० - २१ मधील प्रथम पाणीपाळी २७ नोव्हेंबर रोजी सोडण्याचे नियोजन करण्यात आले. रब्बी हंगामातील उर्वरित दोन पाणीपाळ्या व उन्हाळी हंगामातील चार पाणीपाळ्या सोडण्याबाबतचा अंतिम निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात येईल, असे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाचे (क्रमांक एक) उपकार्यकारी अभियंता, ए. एच. गोकुळे यांनी कळविले.

पाण्याचे नियोजन ठरल्याने शेतकरी रब्बी हंगामाच्या नियोजनाला लागले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...