नांदेड जिल्ह्यात `शेतकरी सन्मान`चा पहिला, दुसरा हप्ता जमा

नांदेड जिल्ह्यात `शेतकरी सन्मान`चा पहिला, दुसरा हप्ता जमा
नांदेड जिल्ह्यात `शेतकरी सन्मान`चा पहिला, दुसरा हप्ता जमा

नांदेड : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM-KISAN) योजनेतंर्गत जिल्हयातील २ लाख ५७ हजार ६२५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला आणि दुसरा हप्ता जमा करण्यात आला. १ लाख ३६ हजार १२९ शेतकऱ्यांना पहिल्या, तर १ लाख २१ हजार ४९६ शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याचा लाभ झाला आहे. 

जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील ६ हजार ३६२, भोकर तालुक्यातील ६ हजार ८८९, बिलोलीतील ७ हजार ७९२, देलगूरमधील १० हजार ६७४, धर्माबादमधील ५ हजार ८९८, हदगावातील १५ हजार ९२६, हिमायतनगरमधील १० हजार ७५३, कंधारमधील १२ हजार ८७३, किनवटमधील १४ हजार ३१०, लोह्यातील ७ हजार ३५२, माहूरमधील ६ हजार ३३०, मुदखेडमधील ५ हजार ५७८, मुखेडमधील ११ हजार २००, नायगावातील ७ हजार ८४२, नांदेडमधील १०४, उमरीतील ६ हजार ६०६ लाभार्थीच्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात आला. 

जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील ३ लाख ४ हजार ९२५ पात्र लाभार्थी कुटुंबांची माहिती फेब्रुवारी महिन्यात ‘पीएम किसान पोर्टल''वर अपलोड करण्यात आली. 

या योजनेतंर्गत क्षेत्र मर्यादेची अट शिथिल (अल्प, अत्यल्प व बहुभूधारक) सरसकट सर्व भूधारक शेतकऱ्यांना लागू करण्यात आली. त्यानुषंगाने नवीन पात्र असलेल्या ८६  हजार ८१३ लाभार्थी कुटुंबांची माहिती जूनमध्ये पोर्टलवर अपलोड करण्यात आली. जिल्ह्यात एकूण ३ लाख ९१ हजार ७३८ पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाची माहिती अपलोड झाली.

वंचित पात्र लाभार्थी कुटुंबाचा शोध घेऊन तालुका स्‍तरावर अपलोड करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

दुसरा हप्ता मिळालेले लाभार्थी

तालुका शेतकरी संख्या
अर्धापूर  ५ ८२५ 
भोकर ६०२५ 
बिलोली ६८२५
देलगूर  ९९०
धर्माबाद ५ ८६०
हदगाव १४२१९ 
हिमायतनगर ७ ८५१
कंधार १२३६१
किनवट १२६४९
लोहा ६९९१
माहूर ६२४८
मुदखेड ५२५८
मुखेड  ८९०९
नायगाव  ६९१७
नांदेड ८३
उमरी ६३८५
-- --

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com