agriculture news in Marathi first time chaitry wari without warkari Maharashtra | Agrowon

चारशे वर्षात पहिल्यांदाच वारकऱ्यांविना चैत्र वारी 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 एप्रिल 2020

सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेल्या चैत्री वारीला शनिवारी (ता.४) कोरोनाच्या संकटामुळे वारकरी पंढरीत येऊ शकले नाहीत.

सोलापूर ः सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेल्या चैत्री वारीला शनिवारी (ता.४) कोरोनाच्या संकटामुळे वारकरी पंढरीत येऊ शकले नाहीत. दरवर्षी लाखोच्या संख्येने वारकऱ्यांची असणारी वर्दळ यंदा मात्र झाली नाही. त्यामुळे मंदिर परिसरासह अवघ्या पंढरपुरात शुकशुकाट राहिला. इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांच्या गर्दीविना ही वारी पार पडली. 

चैत्री एकादशीची श्री. विठ्ठल-रुक्मिणीमातेची महापूजा पहाटे मंदिर समितीचे सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यानिमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात सुमारे ४०० हून अधिक किलो गुलाब फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यामुळे श्री. विठ्ठल-रुक्मिणीमातेची मूर्ती अधिकच लोभस दिसत होती. पहाटे महापूजा आणि नेहमीप्रमाणे नित्योपचार पार पडले.

या वेळी आमदार ठाकूर म्हणाले, संकटाच्या काळात चैत्री वारीतील विठ्ठलाची पुजा मला सर्वांचा प्रतिनिधी म्हणून करण्याचे भाग्य लाभले, देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्याचे धैर्य आणि बळ देऊन सर्वांची या संकटातून लवकर मुक्तता कर, असे साकडे श्री. विठ्ठलाला घातल्याचे सांगितले. 

यावेळी मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी तथा श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, नायब तहसीलदार तथा व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख अमित नवले, श्रीकांत सानप उपस्थित होते.

दरम्यान, वारीकाळात एरव्ही मंदिर परिसर आणि अवघ्या पंढरपुरात वारकऱ्यांच्या वर्दळीने रस्ते व्यापून गेलेले असतात, पण यंदा अशी कोणतीही वर्दळ आज पंढरपुरात दिसत नव्हती, असे चित्र पहिल्यांदाच अनुभवायला आले.


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...