इतिहासात प्रथमच अधिवेशन कामकाज पावसामुळे बंद : धनंजय मुंडे

इतिहासात प्रथमच अधिवेशन कामकाज पावसामुळे बंद : धनंजय मुंडे
इतिहासात प्रथमच अधिवेशन कामकाज पावसामुळे बंद : धनंजय मुंडे

नागपूर : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच अधिवेशन कामकाज पावसामुळे बंद. मुख्यमंत्र्यांच्या अट्टाहासाने आमदारांचे हाल, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.

पावसाळी अधिवेशन अट्टहासाने नागपूरला घेतल्यानंतर आज पहिल्याच पावसात विधीमंडळाचे अधिवेशन स्थगित करावे लागले. रात्रभर पडलेल्या पावसामुळे विधानभवनच्या पॉवर हाऊसमधे पाणी साचले आणि त्यामुऴे संपुर्ण वीज बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे अधिवेशन बंद करावे लागले.

पॉवर हाऊस मधे पाणी गेल्याने धोक्याचा इशारा म्हणून जनरेटर देखील सुरू करण्यास अधिकाऱ्यांनी मज्जाव केला त्यामुळे विधानभवनात येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या ओळखपत्राची मोबाईलच्या बॅटरीमधून तपासणी करण्यात येत होती.

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या निष्काळजीपणावर टिका केली. अजित पवार यांनी संताप व्यक्त करत कशाला केला होता अट्टहास ? मुहूर्तावर अधिवेशन घेतले तरी संकट टाळता आले नाही काय ? असा सवाल केला. नागपूर महापालिकेची चौकशी करा, अशी मागणी शिवसेना आमदाराने केली. विधानभवनाचे हे हाल तर महाराष्ट्राचे काय हाल असतील असा सवाल विरोधी आमदार सत्ताधारी आमदारांना विधानभवन आवारात विचारत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com