४७ वर्षांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये मुळा धरणाचे सर्व दरवाजे उघडले !

मुळानगर : मुळा धरणाचे अकरा दरवाजे आज (मंगळवारी) उघडण्यात आले. मुळा नदीपात्रात अकराशे क्युसेकने सुरू असलेला विसर्ग.
मुळानगर : मुळा धरणाचे अकरा दरवाजे आज (मंगळवारी) उघडण्यात आले. मुळा नदीपात्रात अकराशे क्युसेकने सुरू असलेला विसर्ग.

राहुरी, जि. नगर : मुळा धरणात १९७२ पासून पाणी साठविण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून ४७ वर्षांत प्रथमच १५ ऑक्टोबर नंतर धरणाचे सर्व अकरा दरवाजे आज (मंगळवारी) सकाळी सात वाजता एक इंच उघडण्यात आले. धरणातून मुळा नदीपात्रात अकराशे क्‍युसेकने विसर्ग सोडला जात आहे.   नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या २६ टीएमसी साठवण क्षमतेच्या मुळा धरणातून यावर्षी आत्तापर्यंत अकरा टीएमसी पाणी नदीपात्रात व कालव्यांद्वारे सोडले आहे.  खरीप सिंचनाचे एक आवर्तन पूर्ण करून, १५ ऑक्टोबर रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरले. मागील दोन दिवसात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सक्रिय झाला. आज (मंगळवारी) सकाळी सात वाजता कोतुळ येथे मुळा नदीपात्रातून ५६१ क्युसेकने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली. त्यामुळे, धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले.   धरणातून नदीपात्रात ३०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे नियोजन आहे.  मुळा नदीपात्रातील डिग्रस, मानोरी, मांजरी व वांजुळपोई येथील बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी या पाण्याचा उपयोग केला जाईल. धरणाच्या पाणलोटात पावसाने उघडीप दिली. तर, शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी धरणाचे दरवाजे बंद होतील. यापुढे, रब्बी हंगामात दोन व उन्हाळी हंगामात दोन सिंचनाची आवर्तने अपेक्षित आहेत. सिंचनाची तीन आवर्तने निश्चित मिळणार आहेत. परंतु, योग्य नियोजन केल्यास, एप्रिल-मे २०२० मध्ये उन्हाळ्यात दुसरे आवर्तन होऊ शकते. 'मुळा' च्या प्रकल्प अहवालात सिंचनासाठी १९,०८० दशलक्ष घनफूट, औद्योगिक व पिण्याच्या पाण्यासाठी ५,८०४ दशलक्ष घनफूट पाण्याची तरतूद आहे. अचल साठा ४५०० दशलक्ष घनफूट वगळता सिंचनासाठी १४,५८० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे.

प्रतिक्रिया...  "यावर्षी 'मुळा' तून खरिपाचे आवर्तन पूर्ण होऊन, धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. जायकवाडीला पाणी जाणार नाही. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सिंचनाच्या आवर्तनांचे नियोजन होईल. यापुढे, आणखी तीन आवर्तनाचे पाणी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य केले. कालव्यांतून विनापरवाना, बेकायदेशीर पाणी उपसा केला नाही. तर, पाणी बचत होईल. शिल्लक पाण्यातून उन्हाळी दुसऱ्या आवर्तनाचा विचार होऊ शकतो. - किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, नगर.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com