ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण 

दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी तालुक्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेसाठी वरदान ठरलेले सीना धरण स्थापनेपासून यंदा प्रथमच ऑगस्ट महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले आहे.
sina dam
sina dam

नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी तालुक्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेसाठी वरदान ठरलेले सीना धरण स्थापनेपासून यंदा प्रथमच ऑगस्ट महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. निळवंडे, मुळा धरणापेक्षा कितीतरी उशिरा तर कधी कोरडे राहणारे हे धरण एकोणतीस वर्षात प्रथमच धरण लवकर भरल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. 

नगर, पारनेर तालुक्यात काही दिवसांपासून सीना धरण नदी पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या दमदार पावसामुळे कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण शंभर टक्के भरले आहे. सीना धरण निर्मितीपासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात पाणलोट क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने धरण भरले आहे. यामुळे येथील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

धरण पाणलोट क्षेत्रात नुकत्याच झालेल्या पावसाने पाण्याची आवक चांगली आली आहे. तालुक्यातील कायम दुष्काळी व जिरायती भागाला वरदान ठरलेल्या सीना धरणाची पाणी साठवण क्षमता २.४० टीएमसी असून या धरणावर मिरजगाव, निमगाव सह सतरा गावे पाणीपुरवठा योजना तसेच श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील पाणी पुरवठा योजना आहे. तसेच टंचाई काळात याच धरणातील पाईप लाईनद्वारे आष्टी, जामखेड व कर्जत तालुक्यातील पाण्याचे शासकीय टँकर भरण्याची मांदळी येथून सुविधा आहे. यापुर्वी सीना धरणात परतीच्या पावसाच्या पाण्याची आवक आल्याचा इतिहास आहे. सीना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सीना लाभक्षेत्रातील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.  प्रतिक्रिया सीना धरण परतीच्या पावसावरच भरते. यावर्षी सुरुवातीला ऑगस्टमध्ये धरण भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून सीना नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी दक्षता बाळगावी.  - बाजीराव थोरात, उपविभागीय अधिकारी, सीना प्रकल्प   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com