agriculture news in Marathi first time sina dam full in August Maharashtra | Page 4 ||| Agrowon

ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी तालुक्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेसाठी वरदान ठरलेले सीना धरण स्थापनेपासून यंदा प्रथमच ऑगस्ट महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले आहे. 

नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी तालुक्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेसाठी वरदान ठरलेले सीना धरण स्थापनेपासून यंदा प्रथमच ऑगस्ट महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. निळवंडे, मुळा धरणापेक्षा कितीतरी उशिरा तर कधी कोरडे राहणारे हे धरण एकोणतीस वर्षात प्रथमच धरण लवकर भरल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. 

नगर, पारनेर तालुक्यात काही दिवसांपासून सीना धरण नदी पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या दमदार पावसामुळे कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण शंभर टक्के भरले आहे. सीना धरण निर्मितीपासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात पाणलोट क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने धरण भरले आहे. यामुळे येथील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

धरण पाणलोट क्षेत्रात नुकत्याच झालेल्या पावसाने पाण्याची आवक चांगली आली आहे. तालुक्यातील कायम दुष्काळी व जिरायती भागाला वरदान ठरलेल्या सीना धरणाची पाणी साठवण क्षमता २.४० टीएमसी असून या धरणावर मिरजगाव, निमगाव सह सतरा गावे पाणीपुरवठा योजना तसेच श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील पाणी पुरवठा योजना आहे.

तसेच टंचाई काळात याच धरणातील पाईप लाईनद्वारे आष्टी, जामखेड व कर्जत तालुक्यातील पाण्याचे शासकीय टँकर भरण्याची मांदळी येथून सुविधा आहे. यापुर्वी सीना धरणात परतीच्या पावसाच्या पाण्याची आवक आल्याचा इतिहास आहे. सीना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सीना लाभक्षेत्रातील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 

प्रतिक्रिया
सीना धरण परतीच्या पावसावरच भरते. यावर्षी सुरुवातीला ऑगस्टमध्ये धरण भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून सीना नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी दक्षता बाळगावी. 
- बाजीराव थोरात, उपविभागीय अधिकारी, सीना प्रकल्प 
 


इतर अॅग्रो विशेष
उन्हाळी कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे...नाशिक : साठवलेल्या उन्हाळी कांद्याचा हंगाम अंतिम...
जळगाव जिल्ह्यात २५ हजार कृषिपंपांची वीज...जळगाव ः  जिल्ह्यात वीजबिले भरल्याशिवाय...
सोयाबीन वायद्यांत सुधारणापुणे ः बाजारात सोयाबीनचे दर पडल्यानंतर केंद्रीय...
‘फॅसिझमविरोधात लढण्यास  सक्षम पर्याय...मुंबई : देशात सुरू असलेल्या फॅसिझमविरोधात लढण्यास...
आझाद मैदानावर बुधवारपासून  गट सचिवांचे...सांगली ः राज्यातील गट सचिवांचे सेवा व वेतनाचे...
विमा कंपनीच्या कार्यालयात  मुक्काम...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...
पीडीसीसी’च्या निवडणुकीसाठी २९ अर्ज दाखल पुणे : राज्यात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा...
फळबाग, जिरॅनियम प्रक्रियेतून शाश्‍वत...नागठाणे (जि. सातारा) येथील सुनील हणमंत साळुंखे...
अभ्यासपूर्ण शेतीतून मिळवले हंगामी...मालेगाव (जि. वाशीम) येथील सय्यद शारीक सय्यद गफूर...
बदलत्या वातावरणात द्राक्ष बागेचे...पावसामुळे बागेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले आहे....
२४० एकरांसाठी सामुहिक स्वयंचलित ठिबक...ऊस व द्राक्षे या पिकांसाठी प्रसिद्ध अहिरवाडी (जि...
‘तहसील’चा वीजपुरवठा खंडित;  थकबाकी न...नंदुरबार ः वेळोवेळी तगादा लावून व अखेर थकबाकी...
हळदीचे दर स्थिर सांगली ः सध्या देशभरात देशात हळदीची ३७ लाख पोती...
ऊस पाचट वजावटीपोटी  २२५ कोटींवर डल्ला पुणे ः यंत्राने होणाऱ्या ऊसतोडीत पाचटाच्या...
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार...पुणे : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब...
देशातील ७२ गावे होणार ‘व्हिलेज ऑफ एक्‍...नागपूर ः केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इस्राईल...
राज्य, परराज्यातील मजुरांचा  कडवंची...जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून...
निसर्गाच्या साक्षीने रंगली गोष्ट एका...अकोला ः सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या...
शिरूरमध्ये दोन हजार रोहित्रे बंद पुणे : वीजबिल थकल्याने महावितरण शिरूर उपविभागातील...
जालन्यात विम्यासाठी ‘स्वाभिमानी’चे...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...