उपळावीत पहिल्यांदाच पोचले ताकारीचे पाणी
उपळावीत पहिल्यांदाच पोचले ताकारीचे पाणी

उपळावीत पहिल्यांदाच पोचले ताकारीचे पाणी

या भागात अगोदर ताकारीचे पाणी कधीच आले नाही. पाणी आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणुकीमुळे हे पाणी आमच्यापर्यंत आल्याची शंका आहे. - सुनील पाटील, शेतकरी, उपळावी, ता. तासगाव.

सांगली : ताकारी उपसासिंचन योजनेचे उपळावी (ता. तासगाव) येथे गेल्या दोन ते तीन वर्षांत ताकारीचे पाणी कधी पोचले नाही. मात्र, पहिल्यांदाच येथील मुख्य कालव्यातून पाणी वाहू लागल्याने शेतकऱ्यांमधून आश्‍चर्य व्यक्त होते आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणी सोडले असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. 

ताकारी योजना सुरू होऊन सुमारे पंचवीस वर्षांहून अधिक वर्षे झाली. या योजनेत तासगाव, कडेगाव, खानापूर, वाळवा हे तालुके समाविष्ट आहेत. ताकारी उपसा सिंचन योजनेमुळे १०८ किलोमीटर वरील ५३ गावांतील ८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. रब्बी, उन्हाळी अशी आवर्तने दिली जातात. प्रत्येक आवर्तन हे १०८ किलोमीटर पर्यंत गेल्यानंतर योजना बंद केली जाते. पुनदी गावापासून पुढे उपळावीपर्यंत म्हणजेच ४० किलोमीटरवरील या मुख्य कालव्याचे काम गेल्या पाच ते सहा वर्षात पूर्ण झाले. तरीही गेल्या दोन ते तीन वर्षांत या गावातील लाभ क्षेत्राला कधीच पाणी मिळाले नाही. 

ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होऊन महिना झाला. सध्या १०८ किलोमीटर वरील लाभ क्षेत्राला पाणी मिळाले आहे. आता हेच पाणी पुढे चाळीस किलोमीटर म्हणजेच तासगाव तालुक्यातील उपळावी गावात पोचले आहे. या योजनेच्या मुख्य कालव्यातून पाणी वाहून लागल्याने शेतकरी आनंदी आहेत. 

हे पाणी पोटकालव्यात सोडणार की नाही, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. पुनदीपासून पुढे पाणी कसे जाते, याच्या तपासणीसाठी पाणी सोडले असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. या योजनेचा मुख्य कालवा गेल्या दोन वर्षात पूर्ण झाला. मात्र, तेव्हापासून पुनदीपासून पुढे पाणी सरकले नाही. सध्या लोकसभेच्या निवडणूक लक्षात घेऊन हे पाणी उपळावीपर्यंत सोडले असल्याची चर्चा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com