agriculture news in marathi First two corona patient discharged for hospital after cure | Page 2 ||| Agrowon

देशातील पहिल्या दोन कोरोनामुक्त व्‍यक्‍तींना डिस्‍चार्ज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 मार्च 2020

पुणे : जिल्‍ह्यात कोरोनाच्‍या पहिल्‍या ज्या  दोन व्‍यक्‍ती अॅडमिट झाल्‍या होत्‍या, त्‍यांच्‍या दोन्‍ही टेस्‍ट निगेटिव्ह आल्‍या आहेत,  त्‍यामुळे बुधवारी (ता.२५) त्‍यांना डीस्‍चार्ज देण्यात आला.

पुणे : जिल्‍ह्यात कोरोनाच्‍या पहिल्‍या ज्या  दोन व्‍यक्‍ती अॅडमिट झाल्‍या होत्‍या, त्‍यांच्‍या दोन्‍ही टेस्‍ट निगेटिव्ह आल्‍या आहेत,  त्‍यामुळे बुधवारी (ता.२५) त्‍यांना डीस्‍चार्ज देण्यात आला. दुस-या दिवशी जे  तीन पेशंट अॅडमिट झाले होते,  त्‍यांच्‍या  पहिल्‍या टेस्‍ट निगेटिव्ह आल्‍या आहेत,  त्‍यांच्‍या दुस-या टेस्‍ट घेत आहोत, त्‍या निगेटिव्ह आल्‍या तर त्‍यांना उद्या डिस्‍चार्ज दिला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिली. 

गुढीपाडव्‍याच्‍या शुभेच्‍छा देतांनाच सर्वांच्‍या मदतीने कोरोनावर मात करू, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.पुणे विभागातील कोरोनाच्‍या सद्यःस्थितीची माहिती देताना विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, पुणे विभागात एकूण  ८२५ नमुने घेतले होते, त्यांपैकी ७३७ चे अहवाल प्राप्‍त झाले. यामध्‍ये ६९२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ३७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याचा अर्थ जवळजवळ ९० टक्‍के अहवाल निगेटिव्ह आलेत, ही समाधानाची बाब आहे. 

पंतप्रधान श्री. मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला आहे. त्‍याचे नागरिकांनी कुठेही उल्‍लंघन करू नये, असे आवाहन करून ते म्‍हणाले,  या २१ दिवसांत आपल्‍या सर्वांची साथ, सर्वांचे सहकार्य  या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी मदत करू शकते. कोणत्‍याही जीवनावश्‍यक वस्‍तू म्‍हणजे औषधी, भाजीपाला, अन्‍नधान्‍य आपल्‍यापर्यंत पोहोचण्याचा आमचा अटोकाट प्रयत्‍न राहील, प्रशासन यासाठी नियोजन करत आहे. आपण या नियोजनाला  सहकार्य करावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.
आरोग्‍य यंत्रणेने पहिले दोन पेशंट बरे व्‍हावे, यासाठी रात्रंदिवस अथक प्रयत्‍न केले. पुणे, पिंपरी चिंचवड तसेच  विभागाच्‍या इतर जिल्‍ह्यातील अधिकारी हे कोरोनाच्‍या प्रतिबंधासाठी काम करीत आहे, या सर्वांचे त्‍यांनी कौतुक केले. 
 


इतर ताज्या घडामोडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कोरोना’चा प्रवेश...सिंधुदुर्ग  ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कोरोना’...
जळगावात केळी वाहतुकीसाठी ई-पास सुविधाजळगाव  ः परराज्यात केळी पाठविण्यासाठी जळगाव...
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत ‘...जिनिव्हा : कोरोना व्हायरसची लागण चीनमधूनच...
कोल्हापुरात ‘कोरोना’चे २ रुग्णकोल्हापुर  : नजीकच्या सांगली जिल्ह्यातील...
सोलापुरातील शेतकरी निवडताहेत बेदाण्याचा...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम...
Good News : सांगलीतून ९० लहान गाड्या...सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक आणि द्राक्ष...
इस्लामपूर येथे आणखी १२ जणांना ‘कोरोना’...सांगली ः इस्लामपूर येथील कोरोनाग्रस्त कुटुंबातील...
परराज्यातील वाहने अडविल्यास ‘पणन’चा ‘हा...पुणे : कोरोना कर्फ्यूमध्ये राज्यात...
रिझर्व्ह बँकेने कर्जवसुली स्थगितीचे ...मुंबई : ‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर...
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची मुदत ३०...नगर  : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
सोलापूर बाजार समितीतीत लिलाव ३१...सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात पेट्रोल-डिझेल विक्रीवर ३१...सोलापूर ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेळीच...
पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये...पुणे  : ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाला...
वादळी पावसाने रब्बी हंगामातील पिके आडवीनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत रब्बी पिकांचे...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात बुधवारी...
पीक मळणीसाठी हार्वेस्टर, ट्रॅक्टरला...बुलडाणा ः सध्या गहू, हरभरा काढणीचा हंगाम सुरू...
‘अवकाळी’ने पुणे जिल्ह्यात पिकांचे नुकसानपुणे  ः पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर,...
पुणे जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाला `...पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा...
शेतमाल वाहतुकीस अडथळा नकाे; नागपूर...नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि...
शेतमाल सोलापूरसह पुणे, मुंबईच्या...सोलापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...