agriculture news in marathi first vaccination to three corer Corona Fighters : PM Modi | Agrowon

तीन कोटी कोरोना योद्ध्यांना मोफत लस

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 जानेवारी 2021

 देशभरात शुक्रवारपासून (ता. १६) सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेमध्ये तीन कोटी कोरोना योद्ध्यांना मोफत लस दिली जाणार आहे. यासाठीचा सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे.

नवी दिल्ली :  देशभरात शुक्रवारपासून (ता. १६) सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेमध्ये तीन कोटी कोरोना योद्ध्यांना मोफत लस दिली जाणार आहे. यासाठीचा सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (ता.११) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान ही घोषणा केली. या बैठकीदरम्यान लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. तसेच लशीसाठी राजकीय नेत्यांनी रांग तोडून पुढे जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी बोलताना पंतप्रधान मोदींनी सांगितले, की सरकारने संमती दिलेल्या कोरोनावरील दोन्ही लशी जगभरातील इतर लशींच्या तुलनेत अधिक किफायतशीर आहेत. दोन्हीही ‘लशी मेड इन इंडिया’ आहेत. या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये या लशींचा वापर होणार असून ५० हून अधिक वय असलेल्यांना लस देण्याच्या टप्प्यामध्ये आणखी लसींचा पर्याय उपलब्ध होईल असाही दावा पंतप्रधान मोदींनी केला. भारताला लसीसाठी बाहेरच्या देशांवर अवलंबून राहावे लागले असते तर किती त्रास झाला असता याची कल्पना करवत नाही, अशीही टिप्पणी केली.

१६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू होत असून यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक आणि कोरोना योद्धे अशा ३ कोटी जणांना लस मिळेल. त्यानंतर ५० वर्षांवरील २७ कोटी नागरिकांना लस देण्याचे नियोजन सरकारने केले आहे. या मोहिमेसाठी आधीच देशभरात दोन वेळा रंगीत तालीम घेण्यात आली आहे. त्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की लसीकरणामध्ये कोणाला प्राधान्य द्यायचे आहे याबाबत राज्यांशी सल्लामसलत झाली असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी , पोलिस यासारख्या कोरोना योद्यांना लस दिली जाईल. यासाठीचा सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे. याचा आर्थिक भार राज्यांवर पडणार नाही. 

लसीकरण मोहिमेसाठी को-विन अॅप तयार करण्यात आले असून लसीकरणाचा साद्यंत तपशील या अॅपवर उपलब्ध होईल. या अॅपद्वारेच लस मिळेल. ‘आधार’च्या मदतीने लाभार्थ्यांची ओळख पटविली जाईल. पहिला डोस दिल्यानंतर लाभार्थ्याला प्रमाणपत्र मिळेल. येत्या काही महिन्यात ३० कोटी लोकांच्या लसीकरणाचेही नियोजन असल्याचे सांगताना मोदी म्हणाले की लस घेतल्यानंतर दुष्परिणाम जाणवल्यास उपचारासाठी देखील तयारी करण्यात आली आहे. अर्थात, लस आल्यानंतरही कोरोना संक्रमण रोखण्यासाठीचे सर्व निकष पाळावेच लागतील, या इशाऱ्याचा मोदींनी पुनरुच्चार केला. तसेच या मोहिमेत अफवांमुळे अडथळा येऊ नये याची काळजी घेतली जावी, असेही आवाहन केले. या मोहिमेमुळे नियमितपणे सुरू असलेल्या इतर लसींच्या वितरणावर परिणाम होणार नसल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. यासोबतच, बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी राज्यांना केले. 
 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...