कोरोनामुळे मासे निर्यातीला फटका

fish export
fish export

रत्नागिरी ः कोरोना विषाणूमुळे चीनमधील निर्यातीवर मोठा परिणाम होत आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या फ्रोजन माशांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. मुंबई वगळता कोकणातून १५ ते १६ हजार टन तर संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ६० हजार टन माशांची निर्यात होते. सध्या निर्यातीवर परिणाम सुरू झाला असून, कोरानामुळे दोन महिन्यांनी सुमारे ३० टक्के निर्यात घटेल, असा अंदाज रत्नागिरीतील गद्रे मरीन एक्स्पोर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर अर्जुन गद्रे यांनी वर्तविला आहे. चीनमध्ये थैमान घातलेला कोरोनाचा जगाने धसका घेतला आहे. कोरोना टाळण्यासाठी समुद्री पदार्थ खाऊ नयेत अशा सूचना दिल्या जात आहेत. कोरोनाचे विषाणू कुठूनही येऊ शकतात, त्यामुळे सध्या सतर्कता बाळगली जात आहे. त्यामुळे माशांपासून तयार केलेले रेडी टू इटसारख्या पदार्थांच्या ऑर्डर नव्याने कुठलाही देश स्वीकारण्यास तयार नाही. राणी माशाच्या लगद्यापासून सुरमी तयार केली जाते आणि याचे मोठे मार्केट जपान, अमेरिका, इटली आणि युरोप देशात आहे. एका वर्षात जपानला २० हजार टन, इटली ६५०० टन, अमेरिका ५ हजार टन फ्रोजन मासा निर्यात होतो.  महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. बांगडा, सुरमई, बळा, म्हाकुळ आणि कोळंबी या माशांची निर्यात सर्वाधिक होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच संकटात सापडलेला मत्स्यव्यवसाय सध्या कोरोनासारख्या महारोगाच्या विळख्यात सापडला आहे. ऑर्डरसंदर्भातील बैठका रद्द मार्चपासून पुढील तीन महिने माशांपासून बनवलेले खाद्यपदार्थ कुठल्या देशात किती प्रमाणात लागणार आहे त्याची बोलणी सुरू होती. मात्र सध्या कोरोना या व्हायरसने डोके वर काढल्यामुळे खाद्यपदार्थ विकत घेण्याची बोलणी करायला कुठलाच देश पुढे आलेला नाही. माशापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डरसंदर्भातील बैठका दोन वेळा रद्द झालेल्या आहेत. पुढील काही महिने या बैठका होतील अशी शक्यता नाही. १० ते १२ टक्के नुकसान आत्ताच झाले असून आणखी तीन महिन्यांनंतर कोरोनाचा प्रभाव किती राहील यावर अंदाज बांधावा लागेल. दोन हजार कोटींचा फटका शक्य देशातून जवळपास ५० टक्क्यांहून जास्त फ्रोजन मासा चीनला निर्यात होतो. गुजरात, मुंबई आणि कोचीनच्या बंदरातून ही निर्यात होते. तर, महाराष्ट्रातून मुंबई बंदरातून वर्षाला १५ हजार टन निर्यात होते. परंतु चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने निर्यात ठप्प झाली आहे. चीनमधील बंदरेच बंद असल्यामुळे फ्रोजन माशांच्या निर्यातीवर ३० टक्क्यांहून अधिक परिणाम येत्या दोन महिन्यात होऊ शकतो. सर्वसाधारणपणे भविष्यात सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा फटका निर्यातदारांना बसण्याची शक्यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com