agriculture news in Marathi fish farming in fresh water Maharashtra | Agrowon

कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा प्रयोग यशस्वी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण) येथे कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग असून भूषण सुर्वे यांच्या दीड एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प करण्यात आला होता.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण) येथे कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग असून भूषण सुर्वे यांच्या दीड एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प करण्यात आला होता.

डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, मत्स्यसंशोधन केंद्र मुळदे, नीलक्रांती मत्स्य पर्यटन सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील भूषण सुर्वे यांच्या मालकीच्या जमिनीत कातळावरील प्रायोगिक तत्त्वावर गोड्या पाण्यातील मत्स्यपालन प्रकल्प राबविला होता. कातळावर पावसाचे पाणी साठवून त्यामध्ये मुळदे संशोधन केंद्रात तयार केलेले कटला, रोहू जातीचे ३० हजार बीज ऑगस्ट, सप्टेंबर २०१९ मध्ये सोडण्यात आले होते. 

सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीत तलावात सोडलेल्या माशांची किती वाढ झाली याची मुळदे येथील शास्त्रज्ञांनी माशांची पाहणी केली. या तपासणीत माशांची वाढ अतिशय चांगली झाल्याचे दिसून आले.

या तलावातून सुमारे १० हजार मासे तयार होतील अशी अपेक्षा आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १ हजार ७५० माशांची काढणी करून ते धामापूर धरणात सोडण्यात आले. काढणी केलेल्या माशांचे वजन १०० ग्रॅम झाले आहे. या तलावात सोडण्यात आलेल्या मत्स्यबीजापैकी ४ ते ५ हजार नग वाहून गेले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे जिल्ह्यातील गोड्या पाण्यातील मत्स्यपालन व्यवसायाला गती मिळणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके...नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता....
इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे...कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी...नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या...
चाकूर तालुक्यात गारपीटीने पिके,...चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व...
बंदीवानांनी पिकवला भाजीपालाअकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत...
नांदेड जिल्ह्यात सहा हजार क्विंटल...नांदेड : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची पावणे...औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे...
अकोला पाणी टंचाईच्या उपाययोजना खोळंबल्याअकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात...
अकोला बाजार समितीत गव्हाची टोकन...अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक...
वाडेगावमध्ये शेतकऱ्यांकडून मोफत...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना सहकार्य...
लॉकडाऊनमुळे ओझोनचा थर भरतोय का?सध्या सर्वत्र एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ओझोनचा...
हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयकडे थकले...वर्धा ः सीसीआयला कापूस देणाऱ्या हिंगणघाट तालुक्‍...
नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले...देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने...
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या पोचली...नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या...
पुणे बाजार समितीत ३२५ वाहनांमधून...पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या...
इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळपुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू...
`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर पुणे...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी...