agriculture news in Marathi, Fish production in sindhudurg down, Maharashtra | Agrowon

सिंधुदुर्गात मत्स्योत्पादन घटले
टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 जून 2019

चिपळूण ः मत्स्य उत्पादनात राज्यात मुंबई, ठाणेपाठोपाठ रत्नागिरी जिल्हा आघाडीवर होता. मात्र शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून कोकणातील मत्स्य उत्पादन घटल्याचे समोर आले आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठी घट नोंदविली गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. 

चिपळूण ः मत्स्य उत्पादनात राज्यात मुंबई, ठाणेपाठोपाठ रत्नागिरी जिल्हा आघाडीवर होता. मात्र शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून कोकणातील मत्स्य उत्पादन घटल्याचे समोर आले आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठी घट नोंदविली गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. 

गेल्या वर्षी २०१७-१८ मध्ये ८० हजार ३४० टन, तर या वर्षी २०१८-१९मध्ये ७३ हजार ७३८ टन इतकी मत्स्य उत्पादनात घसरण झाली. त्या खालोखाल सिंधुदुर्ग व रायगडचा समावेश आहे. रायगडमध्ये या वर्षी ५८ हजार ८४७ टन उत्पादन झाले. या पाठोपाठ रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांची मत्स्य उत्पादनात घसरण झालेली असून, सर्वांत जास्त सागरी प्रदूषण असलेल्या मुंबई, ठाणे या जिह्यांचे मत्स्य उत्पादन विक्रमी असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

सिंधुदुर्ग जिह्यात २०१६ -१७ मध्ये सुमारे २२ हजार टन, तर २०१७-१८ मध्ये २० हजार टनांपर्यंत मत्सोत्पादन झाले होते. २०१८-१९ मध्ये त्यात घट होऊन केवळ १९ हजार ५४ टन इतके मत्स्य उत्पादन झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ठाणे जिह्यात २०१२-१३ मध्ये १ लाख २३ हजार ७९२ टन, २०१३-१४ मध्ये १ लाख २० हजार ९२४ टन, २०१४-१५ मध्ये १ लाख ४७०० टन, २०१५-१६ मध्ये ९९ हजार ५२०  टन, तर २०१६५१७ मध्ये ९७ हजार ८०२ टन मत्स्य उत्पादन झाले.

या वर्षी म्हणजे २०१८-१९ मध्ये ठाणे जिह्याच्या मत्स्य उत्पादनात ९९ हजार ४६१ टन इतकी वाढ झाली आहे. मत्स्य उत्पादनाची क्षमता कमी असलेल्या मुंबई उपनगराचे या वर्षी ६३ हजार ५७५ मेट्रिक टन, तर मुंबई शहराचा गेल्या ५ वर्षांत दरवर्षी मत्स्य उत्पादनाचा आलेख चढता असून, २०१६-१७ मध्ये १ लाख ३७ हजार ३४९, तर या वर्षी २०१८-१९ मध्ये १ लाख ५२ हजार ५५७ मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले आहे. ठाणे, मुंबईसह उपनगरांची आजची सागरी स्थिती पाहता सर्वांत जास्त सागरी प्रदूषण या शहरांमध्ये आहे. असे असले तरी येथील मत्स्य उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येत आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या जिह्यांतील बोटी मासेमारीलसाठी मुंबईत जातात. त्या ससून डॉकमध्ये लावल्या जातात. त्यामुळे मुंबईतील मासेमारीचे उत्पादन वाढल्याचे दिसते.

इतर अॅग्रो विशेष
पापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...
बाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव  ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी...
राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः  कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...
श्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...
शेतकऱ्यांच्या ‘महारोषा’चे काय?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...