जालन्यात १६० शेतकऱ्यांना मत्स्यपालनाचे धडे

शेततळ्यातील मत्स्यपालनासाठी ‘आत्मा’च्या प्रशिक्षणाचा मोठा फायदा होत आहे. आधी अयशस्वी झालेले मत्स्यपालन आता यशस्वी होत आहे. माशांचे आजार व खाद्य व्यवस्थापनाची माहिती आम्हाला या प्रशिक्षणामुळे झाली. - सोपान क्षीरसागर, मत्स्यपालन,शेतकरी कडवंची जि. जालना. कृषी विभागातर्फे मोठ्या प्रमाणात शेततळ्यांचा लाभ दिला जात आहे. शेततळ्यांतील पाण्यातून सिंचनासोबतच मत्स्यपालन केले. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण होत आहे. शास्त्रोक्‍त पद्धतीने मत्स्यपालन केल्यास शाश्‍वत उत्पन्न मिळण्याची सोय होत आहे.’ - अनिरुद्ध मगर, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, जालना.
Fisheries lessons for 160 farmers in Jalna
Fisheries lessons for 160 farmers in Jalna

जालना : गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात १६० शेतकऱ्यांनी ‘आत्मा’द्वारे मत्स्यपालनाचे धडे घेतले. त्यापैकी १०३ जणांनी प्रत्यक्षात आपल्याकडील शेततळ्यात मत्स्यपालनाला सुरुवात केली. शेतकऱ्यांनी तांत्रिक प्रशिक्षण घेऊन सुरू केलेले हे मत्स्यपालन त्यांच्या अर्थकारणाला आधार देत आहे.  

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत १६० शेतकऱ्यांनी शेततळ्यात मत्स्यपालन करण्यासाठी प्रशिक्षण घेतले. तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या पनवेल, कर्जत व मुंबई येथे गटाद्वारे प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांनी हे प्रशिक्षण घेतले. त्यात शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायात येणाऱ्या अडचणी, माशांचे आजार, खाद्य व्यवस्थापन आदींविषयी शास्त्रीय माहिती देण्यात आली.

प्रशिक्षणार्थींमध्ये भोकरदन तालुक्‍यातील २८, अंबडमधील ३०, घनसावंगीमधील ६, बदनापूरमधील १५, जालन्यातील ३७, परतूरमधील १८, जाफ्राबादमधील २४, तर मंठा तालुक्‍यातील २ शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतकरी गटांचा सदस्य, शेततळे व त्यामध्ये पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश होता.

प्रशिक्षणार्थींपैकी भोकरदन तालुक्‍यातील १९, अंबड तालुक्‍यातील १२, घनसावंगी तालुक्‍यातील ५, बदनापूरमधील ७, जालन्यातील २५, परतूरमधील १०, जाफ्राबादमधील १३ व मंठा तालुक्‍यातील २ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष मत्स्यपालनाला सुरुवात केल्याची माहिती ‘आत्मा’तर्फे देण्यात आली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com