मत्स्योत्पादन सव्वा लाख टनांवर

राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन गेल्या पाच वर्षांत १ लाख २५ हजार टनांवर स्थिरावले आहे. अत्यंत वेगाने उत्पादन वाढणे अपेक्षित आहे.
मत्स्योत्पादन सव्वा लाख टनांवर Fisheries over a quarter of a million tons
मत्स्योत्पादन सव्वा लाख टनांवर Fisheries over a quarter of a million tons

रत्नागिरी ः राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन गेल्या पाच वर्षांत १ लाख २५ हजार टनांवर स्थिरावले आहे. अत्यंत वेगाने उत्पादन वाढणे अपेक्षित आहे. राज्यात तीन लाख शेततळी असून तीन लाख हेक्टर क्षेत्र धरणाखाली आहे. तरीही उत्पादनात अपेक्षित वाढ होत नाही, हे चिंताजनक आहे, असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांनी केले.  राष्ट्रीय मत्स्यसंवर्धक दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ, मत्स्य व्यवसाय विभाग, राज्य शासन आणि शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय विकासासाठी योजना’ या विषयावर हे चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात महाराष्ट्रातील २१० मत्स्यसंवर्धकांनी सहभाग घेतला होता.  या वेळी कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्यासह मत्स्य व्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे, डॉ. पराग हळदणकर, डॉ. संजय भावे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ. पाटणे म्हणाले, की महाराष्ट्रात आदिवासी बहुल भागात राष्ट्रीय प्रथिनयुक्त आहारात दूध आणि अंडी यांचा पुरवठा शाळेतील विद्यार्थ्यांना केला जातो. त्याच धर्तीवर मत्स्य मत्स्य कापचा पुरवठा कुपोषण दूर करणे शक्य आहे का यावर विचार होणे आवश्यक आहे. मत्स्यशेती करताना पाण्यातील प्राणवायू कमी होऊन मासळी मरते, नुकसान होते. ते टाळण्यासाठी यांत्रिकीकरण आणि स्वयंचलित ऑटोमायझेशन विकसित करणे आवश्यक आहे. मासेमारी नौकाचा डिझेलवर खूप मोठा खर्च होतो. तो खर्च कमी करण्याकरिता सौरऊर्जा, वाऱ्यापासून ऊर्जा, भरती-ओहोटीच्या लाटांपासून ऊर्जानिर्मिती या प्रकल्पांवर काम करणे आवश्यक आहे.  सागरी मच्छीमार आणि गोड्या पाण्यातील मत्स्यशेती करणारे शेतकरी मच्छीमार यांना विम्याचे कवच पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेत दिले जाणार आहे. विद्यापीठाने मत्स्य शेतीकरिता अ‍ॅप तयार करावे. विद्यार्थ्यांनी मत्स्यशेती प्रकल्पांवर काम करणे आवश्यक आहे, असेही पाटणे म्हणाले. मुळदेत मत्स्यबीज उपलब्ध ः डॉ. सावंत  गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनासाठी मत्स्य महाविद्यालयाने विविध तंत्रज्ञान विकसित केले आहे. मुळदे येथील विद्यापीठाच्या संशोधन केंद्रात मत्स्यबीज उपलब्ध आहे. ते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मत्स्य महाविद्यालय काम करत आहे, असे याप्रसंगी कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com