Agriculture news in marathi Fisheries over a quarter of a million tons | Page 2 ||| Agrowon

मत्स्योत्पादन सव्वा लाख टनांवर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन गेल्या पाच वर्षांत १ लाख २५ हजार टनांवर स्थिरावले आहे. अत्यंत वेगाने उत्पादन वाढणे अपेक्षित आहे.

रत्नागिरी ः राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन गेल्या पाच वर्षांत १ लाख २५ हजार टनांवर स्थिरावले आहे. अत्यंत वेगाने उत्पादन वाढणे अपेक्षित आहे. राज्यात तीन लाख शेततळी असून तीन लाख हेक्टर क्षेत्र धरणाखाली आहे. तरीही उत्पादनात अपेक्षित वाढ होत नाही, हे चिंताजनक आहे, असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांनी केले. 

राष्ट्रीय मत्स्यसंवर्धक दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ, मत्स्य व्यवसाय विभाग, राज्य शासन आणि शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय विकासासाठी योजना’ या विषयावर हे चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात महाराष्ट्रातील २१० मत्स्यसंवर्धकांनी सहभाग घेतला होता. 

या वेळी कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्यासह मत्स्य व्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे, डॉ. पराग हळदणकर, डॉ. संजय भावे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ. पाटणे म्हणाले, की महाराष्ट्रात आदिवासी बहुल भागात राष्ट्रीय प्रथिनयुक्त आहारात दूध आणि अंडी यांचा पुरवठा शाळेतील विद्यार्थ्यांना केला जातो. त्याच धर्तीवर मत्स्य मत्स्य कापचा पुरवठा कुपोषण दूर करणे शक्य आहे का यावर विचार होणे आवश्यक आहे.

मत्स्यशेती करताना पाण्यातील प्राणवायू कमी होऊन मासळी मरते, नुकसान होते. ते टाळण्यासाठी यांत्रिकीकरण आणि स्वयंचलित ऑटोमायझेशन विकसित करणे आवश्यक आहे. मासेमारी नौकाचा डिझेलवर खूप मोठा खर्च होतो. तो खर्च कमी करण्याकरिता सौरऊर्जा, वाऱ्यापासून ऊर्जा, भरती-ओहोटीच्या लाटांपासून ऊर्जानिर्मिती या प्रकल्पांवर काम करणे आवश्यक आहे. 

सागरी मच्छीमार आणि गोड्या पाण्यातील मत्स्यशेती करणारे शेतकरी मच्छीमार यांना विम्याचे कवच पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेत दिले जाणार आहे. विद्यापीठाने मत्स्य शेतीकरिता अ‍ॅप तयार करावे. विद्यार्थ्यांनी मत्स्यशेती प्रकल्पांवर काम करणे आवश्यक आहे, असेही पाटणे म्हणाले.

मुळदेत मत्स्यबीज उपलब्ध ः डॉ. सावंत 
गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनासाठी मत्स्य महाविद्यालयाने विविध तंत्रज्ञान विकसित केले आहे. मुळदे येथील विद्यापीठाच्या संशोधन केंद्रात मत्स्यबीज उपलब्ध आहे. ते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मत्स्य महाविद्यालय काम करत आहे, असे याप्रसंगी कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...