Agriculture news in marathi Fisheries through the small dams of the Jambhulani Gram Panchayat | Agrowon

जांभुळणी ग्रामपंचायतीचे बंधाऱ्यांतून मत्स्यपालन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 मार्च 2020

सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांच्या कल्पनेतून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून बंधारे भाडेतत्त्वावर देऊन मत्स्यपालन व्यवसाय उभारला आहे. तो यशस्वीपणे सुरू आहे. यातून गावातील तरुणांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल.  
- संगीता मासाळ, सरपंच, जांभुळणी

आटपाडी जि. सांगली : जांभुळणी (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीने उत्पन्न वाढेल आणि गावातील तरुणांना गावातच रोजगार, व्यवसाय मिळेल, या हेतूने ओढ्यावरील सहा बंधाऱ्यांच्या पाणीसाठ्यात मत्स्यपालन व्यवसाय उभारला आहे. बंधारे गावातीलच तरुणांना भाडेतत्त्वावर दिले आहेत. यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडली आहे. तर, गावातील तरुणांना व्यवसाय मिळाला आहे. जिल्ह्यातील आगळ्यावेगळ्या यशस्वी मत्स्यपालनाची चांगली चर्चा रंगू लागली आहे. 

जांभुळणी ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता मासाळ यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन मत्स्यपालनासाठी बंधारे भाडेतत्वावर देऊन गावातच व्यवसाय उभा करण्याचा यशस्वी प्रयोग साकारला आहे. यासाठी त्यांनी ग्रामसभेत चर्चा केली. बंधारे तरुणांना भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव घेतला. गावातील ओढ्यावर एकूण १२ बंधारे आहेत. पहिल्या टप्प्यात अंदाज घेण्यासाठी त्यांनी पाच सिमेंट बंधारे आणि एक केटीवेअर बंधारा भाडेतत्त्वावर दिला. हे बंधारे मुंबईत हमाली आणि रोजगार करणाऱ्या तरुणांना दिले. त्यांना मत्स्यपालनाचे तज्ञांकडून प्रशिक्षण दिले. अडीच महिन्यापूर्वी प्रत्येक बंधाऱ्यात एक लाख मत्स्यबीज सोडले. 

सर्व बंधारे पाण्याने भरले आहेत. टेंभूच्या मुख्य कालव्यातून थेट बंधाऱ्यात पाणी येऊ शकते. त्यामुळे पाण्याची फारशी अडचण नाही. वाहत्या पाण्याच्या काळात मासे उलट्या प्रवाहाने वर जातात म्हणून अत्यंत मजबूत आणि लहान लोखंडी जाळ्या प्रत्येक बंधाऱ्याच्या वर आणि खाली लावल्या आहेत. त्यामुळे मासे बाहेर जाऊ शकत नाहीत. सध्या हे मासे २५० ग्रॅम वजनाचे झाले आहेत. साधारण सात महिन्यांच्या दरम्यान ते विक्रीयोग्य होतात. एक मासा ५०० ते ७०० किलोग्रॅम होईल, असा अंदाज आहे. विक्रीसाठी अजून तीन महिने वेळ आहे.

एका बंधाऱ्यातून १३ टन उत्पादनाची अपेक्षा

प्रत्येक बंधाऱ्यात एक लाख बीज सोडले आहे. यातील २५ टक्के जिवंत राहिल्यास आणि अर्धा किलो वजनाचे झाल्यास एका बंधाऱ्यातून १२ ते १३ टन उत्पादन अपेक्षित आहे. ८० रुपये प्रतिकिलो दराने मासा विकला, तर दहा लाख रुपये उभा राहू शकतात. खर्च  वजा जाता सात लाख रुपये उत्पन्न राहू शकते, असा अंदाज काढला आहे. 


इतर बातम्या
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...