बुलडाण्यात लॉकडाऊनमध्ये मासेमारीचे ८५.६४ क्विंटल उत्पादन 

बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून अनेक व्यवसायांवर परिणाम झाला. मात्र, मत्स्यव्यवसाय विभागाने लॉकडाऊनमध्ये नियमांचे पालन करीत मच्छिमार सहकारी संस्थांना मासेमारी करण्याची परवानगी दिली. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम झाला असून या कालावधीत तब्बल ८५.६४ क्विंटल उत्पादन काढण्यात आले आहे.
Fishing yield of 85.64 quintals in lockdown in Buldana
Fishing yield of 85.64 quintals in lockdown in Buldana

बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून अनेक व्यवसायांवर परिणाम झाला. मात्र, मत्स्यव्यवसाय विभागाने लॉकडाऊनमध्ये नियमांचे पालन करीत मच्छिमार सहकारी संस्थांना मासेमारी करण्याची परवानगी दिली. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम झाला असून या कालावधीत तब्बल ८५.६४ क्विंटल उत्पादन काढण्यात आले आहे. 

बुलडाणा जिल्ह्यात २७ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी ३० एप्रिलपर्यंत तलाव, जलाशयांच्या ठिकाणी मासेमारी करून ८५.४६ क्विंटल मत्स्योत्पादन घेतले. यावेळी मच्छिमारांनी लॉकडाऊनमधील पाळावयाच्या नियमांचे पालन केले आहे. उत्पादित केलेल्या मासळीची विक्रीही करण्यात आली आहे. मासळी पकडणे, वाहतूक व विक्री करण्यासाठी ७२ पासेस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मासेमारी करताना मच्छिमार संस्थांना सहजता आली. 

लॉकडाऊन कालावधीत २३ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील १०० तलाव, जलाशयांमध्ये २७ मच्छिमार सहकारी संस्थांनी मासळीचे उत्पादन केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मासेमारी उत्पादन, वाहतूक व विक्री सुरू राहल्याने रोजगार उपलब्ध झाला. मासेमारी करताना तलाव, जलाशयांजवळ शारिरीक अंतर, तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधण्याची काळजी घेण्यात आली. 

असे झाले तलाव निहाय मासळीचे उत्पादन   जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून विविध तलावांमधून मासळीचे सहकारी मच्छीमार संस्थांनी घेतलेले उत्पादन पुढीलप्रमाणे आहे : मांडवा (ता. सिंदखेडराजा) : २.२० क्विंटल, कोराडी २.५३, धनवटपूर २.७७, ब्राम्हणवाडा ३, किन्ही मोहदरी १, लव्हाळा (सर्व ता. मेहकर) ०.८० क्विंंटल, धानोरी (ता. चिखली ) १.१०, झरी ३.५०, दहीद (दोन्ही ता. बुलडाणा) १, नळगंगा १२, पलढग १.५०, व्याघ्रा १, धामणगांव बढे ४, पिंपळगांव नाथ ३, धामणगांव देशमुख ३ (सर्व ता. मोताळा), पिंप्री गवळी ३.५९, गारडगांव ३.५०, लांजुड ३.६३, टाकळी ४.९०, बोरजवळा (सर्व ता. खामगांव) ४.१०, येळगांव (ता. बुलडाणा) १०, कंडारी (ता. नांदुरा) ४.५०, गंधारी १.१७, शिवणी जाट ०.७०, खळेगांव १.६५ क्विंटल, पिंपळनेर ( सर्व ता. लोणार) २.५०, राजुरा (ता. जळगांव जामोद) येथे ३ क्विंटल असे एकूण ८५.६४ क्विंटल मासळी उत्पादन काढण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com