नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
ताज्या घडामोडी
सिंधुदुर्गमध्ये बांधले साडेपाच हजार बंधारे
सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात भासणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने लोकसहभागातून कच्चे व वनराई, असे एकूण ५ हजार ५८७ बंधारे बांधून पूर्ण केले आहेत.
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात भासणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने लोकसहभागातून कच्चे व वनराई, असे एकूण ५ हजार ५८७ बंधारे बांधून पूर्ण केले आहेत. कुडाळ तालुक्यात सर्वाधिक १ हजार २२३ बंधारे बांधण्यात आले आहेत.
जिल्ह्यात एप्रिल ते मे या कालावधीत पाणीटंचाई भासते. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नदी-नाल्यावर लोकसहभागातून कच्चे व वनरार्इ बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. वाहून जाणारे पाणी
अडविल्यामुळे अनेक गावातील पाणीटंचाई दूर झाली. काही ठिकाणी पाणी टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे दर वर्षी जिल्हा परिषद प्रशासन कच्चे आणि वनराई बंधाऱ्यांचे नियोजन करते.तालुकानिहाय बंधाऱ्यांचे उद्दिष्ट दिले जाते.
जिल्ह्यात यावर्षी ६ हजार २०० बंधारे बांधण्याचे नियोजन होते. नोव्हेंबरपासून हे बंधारे बांधण्यास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत ५ हजार ५८७ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. यामध्ये २ हजार ९९२ कच्चे व २ हजार ५९५ बंधाऱ्यांचा समावेश आहे. उद्दिष्टांच्या ९०.११ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.
तालुकानिहाय कच्चे, वनराई बंधारे
- कुडाळ १, २२३
- कणकवली ९४६
- कुडाळ १,२२३
- दोडामार्ग ३३२
- वेंगुर्ले ४६५
- मालवण ८०८
- देवगड ६६३
- सावंतवाडी ८३५
- वैभववाडी ३१५