नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट

नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट वाढवून मिळावे, अशी मागणी आहे.
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट On five and a half thousand hectares in the town Objectives of horticulture
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट On five and a half thousand hectares in the town Objectives of horticulture

नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट वाढवून मिळावे, अशी मागणी करत नगर जिल्ह्यात साधारण ५ हजार ५०० हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत ३ हजार हेक्टरसाठी ६ हजार ४५३ शेतकऱ्यांनी अर्ज केले असल्याची माहिती कृषी उपसंचालक विलास नलगे यांनी दिली.  जिल्ह्यात गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीला प्राधान्य दिले असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना बंद असली तरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (एमआरईजीएस) योजनेतून फळबाग लागवड केली जात आहे. यातून लागवडीसह मजुरांना रोजगारही मिळत आहे. ‘मनरेगा’मधून २०१९-२०मध्ये केवळ ५३२ हेक्टरवर लागवड झाली होती. २०२०-२१ मध्ये ३ हजार ६०० हेक्टरवर लागवड झाली.  यंदाही शेतकऱ्यांचा कल तिकडेच असल्याचे दिसत आहे. यंदा वरिष्ठ पातळीवरून ३ हजार ३०० हेक्टरवर लागवड करण्याचे उद्दिष्ट आले आहे. मात्र, गेल्यावर्षी शेतकऱ्यांचा असलेला कल आणि यंदा आतापर्यंत शेतकऱ्यांनी केलेली मागणी पाहता ५ हजार ५०० हेक्टर फळबाग लागवड करण्याचे नियोजन केल्याचे कृषी विभागाने वरिष्ठ पातळीवर कळवले आहे. आतापर्यंत ३ हजार हेक्टरसाठी ६ हजार ४५३ शेतकऱ्यांनी लागवड करण्याबाबत अर्ज केले असून, २ हजार २५२ हेक्टरवरील ३ हजार २७४ अर्जाला तांत्रिक मान्यता तर १९३३ हेक्टरच्या ३ हजार ५३ अर्जाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे आंबा, डाळिंब, सीताफळ, पेरू, लिंबू लागवडीलाच प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी अर्ज करावे, असे आवाहन नलगे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com