Agriculture news in marathi On five and a half thousand hectares in the town Objectives of horticulture | Page 2 ||| Agrowon

नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट वाढवून मिळावे, अशी मागणी आहे.

नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट वाढवून मिळावे, अशी मागणी करत नगर जिल्ह्यात साधारण ५ हजार ५०० हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत ३ हजार हेक्टरसाठी ६ हजार ४५३ शेतकऱ्यांनी अर्ज केले असल्याची माहिती कृषी उपसंचालक विलास नलगे यांनी दिली. 

जिल्ह्यात गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीला प्राधान्य दिले असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना बंद असली तरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (एमआरईजीएस) योजनेतून फळबाग लागवड केली जात आहे. यातून लागवडीसह मजुरांना रोजगारही मिळत आहे. ‘मनरेगा’मधून २०१९-२०मध्ये केवळ ५३२ हेक्टरवर लागवड झाली होती. २०२०-२१ मध्ये ३ हजार ६०० हेक्टरवर लागवड झाली. 

यंदाही शेतकऱ्यांचा कल तिकडेच असल्याचे दिसत आहे. यंदा वरिष्ठ पातळीवरून ३ हजार ३०० हेक्टरवर लागवड करण्याचे उद्दिष्ट आले आहे. मात्र, गेल्यावर्षी शेतकऱ्यांचा असलेला कल आणि यंदा आतापर्यंत शेतकऱ्यांनी केलेली मागणी पाहता ५ हजार ५०० हेक्टर फळबाग लागवड करण्याचे नियोजन केल्याचे कृषी विभागाने वरिष्ठ पातळीवर कळवले आहे.

आतापर्यंत ३ हजार हेक्टरसाठी ६ हजार ४५३ शेतकऱ्यांनी लागवड करण्याबाबत अर्ज केले असून, २ हजार २५२ हेक्टरवरील ३ हजार २७४ अर्जाला तांत्रिक मान्यता तर १९३३ हेक्टरच्या ३ हजार ५३ अर्जाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे आंबा, डाळिंब, सीताफळ, पेरू, लिंबू लागवडीलाच प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी अर्ज करावे, असे आवाहन नलगे यांनी केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...
नगरमध्ये शेवग्याला २००० ते ४५०० रुपये दरनगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली; दरात घटनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...
परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके...परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी...
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण...रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास...
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता...
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे...
साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा...सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात...
आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे,...
नदीकाठावरील ऊस वाहून गेलानेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या...
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
पुण्यात आले, टोमॅटो दरांत सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
वातावरण बदलात पारंपरिक वाण टिकवतील...भारतामधील भूजल साठ्यामध्ये सर्वांत श्रीमंत राज्य...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...