Agriculture news in marathi Five big projects full in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात पाच मोठे प्रकल्प तुडुंब

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

औरंगाबाद : मराठवाड्यातील ११ पैकी पाच मोठे प्रकल्प तुडुंब आहेत. एक प्रकल्प ९९ टक्‍के भरला आहे. चार मध्यम व ४७ लघुप्रकल्प यंदा कोरडे आहेत. तुडुंब असलेल्या प्रकल्पांमधून सिंचनासाठी पाणी मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. 

मराठवाड्यातील ८७३ लघू, मध्यम, मोठ्या व बंधारेरूपी प्रकल्पांत ७४ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पांमधील ८५ टक्‍के, ७५ मध्यम प्रकल्पांतील ५४ टक्‍के, ७४९ लघुप्रकल्पांतील ४७ टक्‍के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांमधील ८३ टक्‍के, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांमधील ६४ टक्‍के उपयुक्‍त पाण्याचा समावेश आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील ११ पैकी पाच मोठे प्रकल्प तुडुंब आहेत. एक प्रकल्प ९९ टक्‍के भरला आहे. चार मध्यम व ४७ लघुप्रकल्प यंदा कोरडे आहेत. तुडुंब असलेल्या प्रकल्पांमधून सिंचनासाठी पाणी मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. 

मराठवाड्यातील ८७३ लघू, मध्यम, मोठ्या व बंधारेरूपी प्रकल्पांत ७४ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पांमधील ८५ टक्‍के, ७५ मध्यम प्रकल्पांतील ५४ टक्‍के, ७४९ लघुप्रकल्पांतील ४७ टक्‍के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांमधील ८३ टक्‍के, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांमधील ६४ टक्‍के उपयुक्‍त पाण्याचा समावेश आहे. 

जायकवाडी, येलदरी, माजलगाव, निम्न मनार व विष्णुपुरी हे पाच प्रकल्प तुडुंब आहेत. दुसरीकडे सिद्धेश्‍वर प्रकल्प जवळपास ९९ टक्‍के भरला आहे. सिनाकोळेगाव प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. उध्‌र्व पेनगंगा ७९ टक्‍के, निम्न तेरणा ३४ टक्‍के, तर निम्म दुधनात १३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. जालना, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्‍क्‍यांच्या आत उपयुक्‍त पाणी आहे. 

बीड जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत ५२ टक्‍के, तर नांदेड, परभणी जिल्ह्यांतील मध्यम प्रकल्पांत ९३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणी आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये ५० टक्‍क्‍यांच्या आत उपयुक्‍त पाणी आहे. नांदेड जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ८१ टक्‍के, हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांत ८५ टक्‍के, परभणीमधील प्रकल्पांत ५२ टक्‍के, तर लातूरमधील प्रकल्पांत ५२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. 

रब्बीत तीन पाणी पाळ्या मिळणार

जायकवाडी प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून १५ डिसेंबर २०१९ ते २९ फेब्रुवारी २०२० दरम्यान पाणी पाळीचे नियोजन करण्यात आले आहे. साधारणत: तीन पाणी पाळ्या यादरम्यान दिल्या जाणार आहेत. त्यासाठीच्या अटी शर्तीचे जाहीर प्रगटनही करण्यात आले आहे. परंतू प्रत्यक्षात पाणी सुटण्याला अजून अवधी आहे. खरीप अवकाळी व अवेळी पावसामुळे हातचा गेला, रब्बी पिकांचीही अडथळ्याची शर्यत आहे. त्यामुळे रब्बीसोबतच उन्हाळी पिकांवर आता शेतकऱ्यांची भीस्त असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना त्या पाणी पाळीची प्रतीक्षा आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...