नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
बातम्या
मराठवाड्यात पाच मोठे प्रकल्प तुडुंब
औरंगाबाद : मराठवाड्यातील ११ पैकी पाच मोठे प्रकल्प तुडुंब आहेत. एक प्रकल्प ९९ टक्के भरला आहे. चार मध्यम व ४७ लघुप्रकल्प यंदा कोरडे आहेत. तुडुंब असलेल्या प्रकल्पांमधून सिंचनासाठी पाणी मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
मराठवाड्यातील ८७३ लघू, मध्यम, मोठ्या व बंधारेरूपी प्रकल्पांत ७४ टक्के उपयुक्त पाणी आहे. त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पांमधील ८५ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांतील ५४ टक्के, ७४९ लघुप्रकल्पांतील ४७ टक्के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांमधील ८३ टक्के, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांमधील ६४ टक्के उपयुक्त पाण्याचा समावेश आहे.

जायकवाडी, येलदरी, माजलगाव, निम्न मनार व विष्णुपुरी हे पाच प्रकल्प तुडुंब आहेत. दुसरीकडे सिद्धेश्वर प्रकल्प जवळपास ९९ टक्के भरला आहे. सिनाकोळेगाव प्रकल्पांत उपयुक्त पाण्याचा थेंब नाही. उध्र्व पेनगंगा ७९ टक्के, निम्न तेरणा ३४ टक्के, तर निम्म दुधनात १३ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. जालना, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांच्या आत उपयुक्त पाणी आहे.
बीड जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत ५२ टक्के, तर नांदेड, परभणी जिल्ह्यांतील मध्यम प्रकल्पांत ९३ टक्क्यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणी आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांच्या आत उपयुक्त पाणी आहे. नांदेड जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ८१ टक्के, हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांत ८५ टक्के, परभणीमधील प्रकल्पांत ५२ टक्के, तर लातूरमधील प्रकल्पांत ५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
रब्बीत तीन पाणी पाळ्या मिळणार
जायकवाडी प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून १५ डिसेंबर २०१९ ते २९ फेब्रुवारी २०२० दरम्यान पाणी पाळीचे नियोजन करण्यात आले आहे. साधारणत: तीन पाणी पाळ्या यादरम्यान दिल्या जाणार आहेत. त्यासाठीच्या अटी शर्तीचे जाहीर प्रगटनही करण्यात आले आहे. परंतू प्रत्यक्षात पाणी सुटण्याला अजून अवधी आहे. खरीप अवकाळी व अवेळी पावसामुळे हातचा गेला, रब्बी पिकांचीही अडथळ्याची शर्यत आहे. त्यामुळे रब्बीसोबतच उन्हाळी पिकांवर आता शेतकऱ्यांची भीस्त असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना त्या पाणी पाळीची प्रतीक्षा आहे.
- 1 of 1498
- ››