गंगापूर, दारणासह पाच धरणांतून विसर्ग

गंगापूर, दारणासह पाच धरणांतून विसर्ग
गंगापूर, दारणासह पाच धरणांतून विसर्ग

नाशिक  : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे धरणसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. गंगापूर धरणात ७५ टक्के जलसाठा झाल्याने आणि त्र्यंबकेश्वर येथे पाऊस सुरू असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये ३४ टक्के साठा झाला असून, त्यातील गंगापूर, दारणा, चणकापूर, पुनंद या चार धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

 शनिवारी (ता.१४) सकाळपासून सुरू झालेल्या पावसाची चौथ्या (ता.१७) दिवशीही संततधार कायम असून, रविवारी (ता.१६) दिवसभर व रात्रीही कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. भावली धरण ८० टक्के भरले आहे. त्र्यंबकेश्वर व इगतपुरीच्या धरण क्षेत्रात सोमवारीही पावसाची हजेरी कायम होती. त्यामुळे खबरदारी म्हणून गंगापूर धरणातून सकाळी दहा वाजता ३१४४ तर दारणा धरणामधून ३७२६ क्युसेक पाणी सोडण्यात आले. दुपारनंतर पुन्हा विसर्गात वाढ करण्यात आली. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातूनदेखील ७२१०, चणकापूरमधून ५६७, पुनंदमधून ११९८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. सतर्कतेचा इशारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून पाणी सोडल्याने गोदावरी, दारणा, कादवा, आरम, गिरणा या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून, नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली. धरणांच्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार असल्यामुळे प्रशासनाने सावधानतेचा इशारा म्हणून नदीच्या काठालगतच्या रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (टक्क्यांमध्ये)  पालखेड समूह २५, वालदेवी ४४, कडवा ४२, चणकापूर ४५, हरणबारी २३

धरणांतील एकूण पाणीसाठा - ३४

 कोरडी धरणे -  भोजापूर, नाग्यासाक्या, माणिकपुंज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com