agriculture news in Marathi five days for correction in bank details Maharashtra | Agrowon

मका उत्पादकांचे लटकलेले चुकारे देण्याचा मार्ग अखेर मोकळा

टीम अॅग्रोवन
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

राज्यातील मका उत्पादकांचे केवळ दुरुस्ती अभावी लटकलेले चुकारे देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

औरंगाबाद : राज्यातील मका उत्पादकांचे केवळ दुरुस्ती अभावी लटकलेले चुकारे देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. केवळ दुरुस्तीसाठी खरेदी पोर्टलची बँक तपशील दुरुस्तीसाठीची लिंक १२ ते १६ ऑक्टोबर २०२० दरम्यान सुरू राहणार आहे. तसे आदेश राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शुक्रवारी(ता ९) दिले. ‘ॲग्रोवन’ने मका उत्पादकाच्या या प्रश्नाला अग्रक्रमाने प्रसिद्धी देऊन वाचा फोडली होती.

राज्यात किमान आधारभूत किमतीने मका खरेदीचे उद्दिष्ट वाढीव मुदतीआधीच पूर्ण झाल्याने एक दिवस आधीच ३० जुलैला मका खरेदीचे पोर्टल सायंकाळी चारच्या सुमारास बंद पडले होते. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास २१२ तसेच जालना जिल्ह्यातील जवळपास २१४ मिळून जवळपास ४२६ मका उत्पादक शेतकऱ्यांच्या चुकाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता.}

काही कारणास्तव पेमेंट परत येणे व बँक पडताळणी बाकी असलेल्या शेतकऱ्यांचा चुकाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. माहितीनुसार पोर्टलमधील दुरुस्तीची लिंक सुरू असणे आवश्यक होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील २१२ शेतकऱ्यांच्या ६५०७.५० क्विंटल मक्याचे चुकाऱ्यपोटी १ कोटी १४ लाख ५३ हजार रुपये अजूनही देणे होते. तर जालना जिल्ह्यात १६४ शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यापोटी जवळपास ३ कोटी २७ लाख रुपये थकित होते. अशीच स्थिती कमी अधिक प्रमाणात राज्यातील इतरही जिल्ह्यात होती. चुकारे मिळण्यात अडचण काय, असा प्रश्न पडल्याने मका उत्पादक खरेदी केंद्रांवर चकरा मारत होते. खरेदी यंत्रणेने वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करून महिना लोटला तरी मार्ग निघाला नव्हता. त्यामुळे मका उत्पादकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला होता. 

‘ॲग्रोवन’चा पाठपुरावा
चुकाऱ्याचे पैसे येऊन पडले, परंतु तांत्रिक अडचणीने ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईना. ‘ॲग्रोवन’ने मका उत्पादकांच्या या प्रश्‍नाला वाचा फोडली. त्याचा परिणाम म्हणून ९ ऑक्टोबरला अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव मनोज कुमार सूर्यवंशी यांनी ‘एनईएमएल’ पोर्टलच्या प्रतिनिधींना बँक तपशीलातील दुरुस्तीसाठीचा भाग १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चुकाऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...