मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ टक्के पेरणी उरकली

लातूर : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत खरिपाची १५ टक्के पेरणी उरकली आहे.
In five districts of Marathwada, 15% sowing was completed
In five districts of Marathwada, 15% sowing was completed

लातूर  : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत खरिपाची १५ टक्के पेरणी उरकली आहे.

लातूर जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ४८ हजार १३७ हेक्टर आहे. त्या तुलनेत ४० हजार ५०२ हेक्‍टरवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे. सरासरी ८६०. ९० मिलिमीटर पावसाची सरासरी असलेल्या लातूर जिल्ह्यात १ ते १८ जुनपर्यंत १२९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र पाच लाख ३२ हजार ७४० हेक्‍टर असून प्रत्यक्ष २२ हजार ३८२ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ६० हजार ५६६ आहे. प्रत्यक्षात १ लाख १५ हजार २९० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. परभणी जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ४२ हजार १७० हेक्टर आहे. प्रत्यक्षात २ लाख १३ हजार ३०४ हेक्टरवर पेरणी उरकली आहे. हिंगोली जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ३५ हजार ५३६ हेक्‍टर आहे.  प्रत्यक्षात ३८ हजार ९३७ हेक्‍टरवर पेरणी उरकली आहे. 

नांदेड जिल्ह्यात सरासरी ९४७.४० मिलिमीटरच्या तुलनेत ९८ मिलिमीटर, परभणी जिल्ह्यात सरासरी ९०३. ३० मिलिमीटरच्या तुलनेत १२७ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात ९२३. ३० मिलिमीटरच्या तुलनेत १२८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

 उस्मानाबादमध्ये आतापर्यंत ११९ मि.मी पाऊस

लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र २९ लाख १९ हजार १५० हेक्टर आहे. त्यापैकी ४ लाख ३० हजार ४१५ हेक्टरवर खरिपाची पेरणी उरकली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ७६०.३० मिलिमीटर असून १८ जूनपर्यंत ११९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com