मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत तूर, हरभरा खरेदी मंदच

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या पाचही जिल्ह्यातील तूर व हरभऱ्याच्या हमी दरातील खरेदीची गती मंदच आहे. ‘लॉकडाउन’च्या कालावधीत ग्रेडर नसल्याने काही ठिकाणी खरेदी थांबली. तर, आता काही ठिकाणी शेतकऱ्यांना हरभरा खरेदीसाठी अद्यावत पीक पेऱ्याच्या सातबाराची अडचण येत आहे.
In five districts of Marathwada, Tour, Gram baying are slow
In five districts of Marathwada, Tour, Gram baying are slow

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या पाचही जिल्ह्यातील तूर व हरभऱ्याच्या हमी दरातील खरेदीची गती मंदच आहे. ‘लॉकडाउन’च्या कालावधीत ग्रेडर नसल्याने काही ठिकाणी खरेदी थांबली. तर, आता काही ठिकाणी शेतकऱ्यांना हरभरा खरेदीसाठी अद्यावत पीक पेऱ्याच्या सातबाराची अडचण येत आहे. ‘एफसीआय’च्या केंद्रांना काही जिल्ह्यात ग्रेडर अभावी ब्रेक लागला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात नाफेडतर्फे तूर व हरभरा खरेदीची सहा केंद्रे मंजूर आहेत. या केंद्रांवर १३७८ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली. या सर्व शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी ८७७ शेतकऱ्यांकडून ४८६० क्विंटल ५० किलो तुरीची खरेदी झाली. दुसरीकडे सहा केंद्रांपैकी गंगापूर, औरंगाबाद व खुलताबाद या तीनच केंद्रांवर ३३० शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या खरेदीसाठी नोंदणी केली. त्यापैकी खुलताबाद केंद्रावरील ४७ शेतकऱ्यांना एसएमएस करण्यात आले. त्यापैकी २१ शेतकऱ्यांकडून १३५ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. 

जालना जिल्ह्यात नाफेडतर्फे मंजूर सहा केंद्रांवर तुरीसाठी १५ एप्रिलपर्यंत ७३२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ६७०२ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी २८६३ शेतकऱ्यांकडून २४ हजार ८८६ क्विंटल १५ किलो तुरीची झाली. १३ एप्रिलपर्यंत खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे दिले गेले. हरभऱ्यासाठी ४५५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ७४० शेतकऱ्यांना एसएमएस पाठविले. त्यापैकी ३४८ शेतकऱ्यांकडून जालना येथील केंद्रावरून ८९९ क्विंटल ९० किलो, तर भोकरदन येथील केंद्रावरून २ हजार ८२२ क्विंटल ५० किलो हरभऱ्याची खरेदी झाली. 

बीड जिल्ह्यात तूर व हरभरा खरेदीची एफसीआयची १२ केंद्रे आहेत. लॉकडाउनपासून जिल्ह्यातील तूर व हरभरा खरेदीची प्रक्रिया एक-दोन अपवाद वगळता ठप्प झाली. लॉकडाउनपूर्वी जिल्ह्यात १५०० क्विंटल तूरीची खरेदी झाली. तुरीसाठी जवळपास १८२०० तर, हरभऱ्यासाठी १५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. केवळ मंगरूळ येथील केंद्र सुरू आहे. गर्दी होत असल्याने कडा येथील केंद्र कधी बंद, तर कधी सुरू ठेवावे लागत असल्याची स्थिती आहे. उर्वरित सर्व १० केंद्रांना ग्रेडर नसल्याने या केंद्रांवरील खरेदी थांबलेली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ही खरेदी पूर्ववत होण्याची आशा असल्याचे मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी सांगितले.  उस्मानाबादमध्ये २४९ शेतकऱ्यांना चुकारे 

उस्मानाबाद जिल्ह्यात तुरीच्या हमी दराने खरेदीसाठी एफसीआयतंर्गत केंद्रावर ५ हजार ३७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी एक हजार ५४० शेतकऱ्यांना एसएमएस पाठविले. त्यापैकी ८१९ शेतकऱ्यांकडून ६ हजार २२६ क्विंटल ४५ किलो तुरीची खरेदी झाली. त्यापैकी २४९ शेतकऱ्यांना त्यांच्या तुरीचे चुकारे दिले गेले. हरभऱ्यासाठी जिल्ह्यात १५६४८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. उस्मानाबाद, कानेगाव, गुंजोती केंद्रावर खरेदी सुरू आहे. लोहारा केंद्रावर खरेदी सुरू झाली आहे. उर्वरित केंद्रासाठी एफसीआयने ऑर्डर काढली आहे. येत्या सोमवारपर्यंत ही केंद्र सुरू होणे अपेक्षित असल्याचे ‘डिएमओ’ कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.  लातूर जिल्ह्यात १२ केंद्रांना मंजुरी 

लातूर जिल्ह्यात तूर व हरभरा खरेदीसाठी नाफेडच्या १२ केंद्रांना मंजुरी मिळाली. तुर खरेदीसाठी २९ हजार ९९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी दहा हजार १९० शेतकऱ्यांकडून ९४ हजार ५४४ क्विंटल तूरीची खरेदी करण्यात आली. हरभऱ्यासाठी २६ हजार २४८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ७३१ शेतकऱ्यांकडील ७८७५ क्विंटल ९० किलो हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com