विदर्भातील पाच जिल्ह्यांत  लाख हेक्‍टरने वाढणार रब्बी क्षेत्र 

खरीप गमावलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता रब्बी हंगामाकडे लागल्या आहेत. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत रब्बी लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज वर्तविला जात आहे.
 विदर्भातील पाच जिल्ह्यांत  लाख हेक्‍टरने वाढणार रब्बी क्षेत्र  In five districts of Vidarbha Rabbi area will increase by one lakh hectares
विदर्भातील पाच जिल्ह्यांत  लाख हेक्‍टरने वाढणार रब्बी क्षेत्र  In five districts of Vidarbha Rabbi area will increase by one lakh hectares

अमरावती : खरीप गमावलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता रब्बी हंगामाकडे लागल्या आहेत. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत रब्बी लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज वर्तविला जात आहे. सरासरीच्या ८ लाख ७४ हजार ५०५ हेक्‍टरवरून हे क्षेत्र ९ लाख ३५ हजार ५८२ पर्यंत विस्तारेल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  खरीप हंगाम अंतिम टप्प्यांत असताना वादळ आणि पावसाने शेतकऱ्यांचे उभे पीक उध्वस्त केले. नद्या, नाल्यांना आलेल्या पुरात देखील अनेक भागात पीक खरडून गेले. खरीप हंगामाचा असा शेवट झाला असतानाच आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा रब्बी हंगामावर लागून आहेत. सध्या जमिनीत ओलावा चांगला असल्याने त्याचा फायदा रब्बी पिकांना होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. परिणामी विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यांत रब्बी क्षेत्र एक लाख हेक्‍टरने वाढेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यानुसार, कृषी विभागाकडून खत, बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये हरभरा लागवड क्षेत्र सर्वाधिक राहते. खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांची रब्बीत हरभऱ्याला पसंती राहते. त्यानुसार विभागात ६ लाख ६२ हजार ५२५ हेक्‍टरवर हरभरा तर २ लाख २० हजार ५९७ हेक्‍टरवर गव्हाची लागवड होते. गेल्या वर्षीच्या हंगामात ८ लाख ७४ हजार ५०५ हेक्‍टरवर रब्बी पिकांची लागवड झाली होती. 

जिल्हानिहाय संभाव्य लागवड  बुलडाणा ः ३ लाख ६ हजार २४७  अकोला ः १ लाख २६ हजार ३८०  वाशीम ः१ लाख ३ हजार ६०६  अमरावती ः१ लाख ९९ हजार ५८५  यवतमाळ ः१ लाख ९५ हजार ८५०  एकूण ः ९ लाख ३५ हजार ८५०  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com