Agriculture News in Marathi In five districts of Vidarbha Rabbi area will increase by one lakh hectares | Page 2 ||| Agrowon

विदर्भातील पाच जिल्ह्यांत  लाख हेक्‍टरने वाढणार रब्बी क्षेत्र 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 ऑक्टोबर 2021

खरीप गमावलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता रब्बी हंगामाकडे लागल्या आहेत. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत रब्बी लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज वर्तविला जात आहे.

अमरावती : खरीप गमावलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता रब्बी हंगामाकडे लागल्या आहेत. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत रब्बी लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज वर्तविला जात आहे. सरासरीच्या ८ लाख ७४ हजार ५०५ हेक्‍टरवरून हे क्षेत्र ९ लाख ३५ हजार ५८२ पर्यंत विस्तारेल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

खरीप हंगाम अंतिम टप्प्यांत असताना वादळ आणि पावसाने शेतकऱ्यांचे उभे पीक उध्वस्त केले. नद्या, नाल्यांना आलेल्या पुरात देखील अनेक भागात पीक खरडून गेले. खरीप हंगामाचा असा शेवट झाला असतानाच आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा रब्बी हंगामावर लागून आहेत. सध्या जमिनीत ओलावा चांगला असल्याने त्याचा फायदा रब्बी पिकांना होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. परिणामी विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यांत रब्बी क्षेत्र एक लाख हेक्‍टरने वाढेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

त्यानुसार, कृषी विभागाकडून खत, बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये हरभरा लागवड क्षेत्र सर्वाधिक राहते. खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांची रब्बीत हरभऱ्याला पसंती राहते. त्यानुसार विभागात ६ लाख ६२ हजार ५२५ हेक्‍टरवर हरभरा तर २ लाख २० हजार ५९७ हेक्‍टरवर गव्हाची लागवड होते. गेल्या वर्षीच्या हंगामात ८ लाख ७४ हजार ५०५ हेक्‍टरवर रब्बी पिकांची लागवड झाली होती. 

जिल्हानिहाय संभाव्य लागवड 
बुलडाणा ः ३ लाख ६ हजार २४७ 
अकोला ः १ लाख २६ हजार ३८० 
वाशीम ः१ लाख ३ हजार ६०६ 
अमरावती ः१ लाख ९९ हजार ५८५ 
यवतमाळ ः१ लाख ९५ हजार ८५० 
एकूण ः ९ लाख ३५ हजार ८५०

 


इतर बातम्या
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी समितीच्या...सिंधुदुर्गनगरी ः ‘‘बियाणे किट वितरण आणि...
सांगली जिल्ह्यात ‘किसान सन्मान’ची वसुली...सांगली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील अपात्र...
सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणी ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात गाळपात...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...
मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...
नाशिक ः सिन्नरच्या पाणी प्रकल्पाचा...नाशिक : नाशिक व सिन्नरच्या विकासासाठी आवश्यक पाणी...
जळगाव जिल्ह्यात १७ हजार बेडची सज्जता जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या...
नांदेड जिल्ह्यात पाच लाख खातेदारांना ‘...नांदेड जिल्ह्यात : पंतप्रधान किसान सन्‍मान निधी (...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
वीजजोड जबरदस्तीने तोडल्यास जशास तसे...सांगली ः महावितरण कंपनीने शेतीपंपांची वीजबिल वसूल...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...
गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...औरंगाबाद ः ‘‘गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
खानदेशात अनेक गावांमधील शिवारात वीज बंद जळगाव ः  खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारमधील...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...