मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस ६०० ते १००० रुपयांपर्यंत दर

मुंबई : कोकणातून सुमारे ४५ हजार पेट्या आंबा घाऊक बाजारात आला आहे. मात्र ग्राहक नसल्याने खरेदीदारांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. परिणामी हापूस आंब्याच्या ५ डझन पेटीस ६०० ते १००० रुपयांपर्यंत दर मिळाला.
 Five dozen hapus rate is 600 to 1000 rupees in Mumbai
Five dozen hapus rate is 600 to 1000 rupees in Mumbai

मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात आंब्याची आवक वाढायला सुरुवात झाली. कोकणातून सुमारे ४५ हजार पेट्या आंबा घाऊक बाजारात आला आहे. इतर भागांतूनही रायवळी आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र ग्राहक नसल्याने खरेदीदारांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. परिणामी हापूस आंब्याच्या ५ डझन पेटीस ६०० ते १००० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

एप्रिलच्या १ तारखेपासून राज्यातील सर्व ठिकाणांहून हापूस आंब्याची आवक घाऊक बाजारात सुरू झाली. फेब्रुवारीमध्ये येणारा आंबा लांबल्याने यावेळी एप्रिलपासून हा आंबा बाजारात यायला सुरुवात झाली. आंब्याच्या वाहतुकीतील अडचणी सरकारने दूर केल्या आहेत. त्यातच उष्णता वाढल्याने आंब्याला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आंबा बागायतदार आणि उत्पादकांनीही आता मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दररोज आंब्याच्या आवकेत मोठी वाढ होत आहे. 

रविवारी वाशीच्या घाऊक बाजारात ११३ गाड्या आंब्यांची आवक झाली. सोमवारी ही आवक १८० गाड्यांवर गेली. फक्त कोकणातून आंब्याच्या ४५ हजार पेट्यांची आवक झाली. कर्नाटक, केरळमधून मोठ्या प्रमाणात आंबे बाजारात येत आहेत. तरीही आंब्याला हवा तसा उठाव मिळत नाही. खरेदीदार बाजारात आंब्याच्या खरेदीसाठी येतच नाहीत. किरकोळ बाजारातही ग्राहक येत नसल्याने आंबा नेऊन करणार काय, असा प्रश्न किरकोळ व्यापारी विचारत आहेत.  निर्यातीस चालना देण्याची गरज  

अगदी दीडशे ते पाचशे रुपये डझन या दरात हापूस आंबा विकला जात आहे. हापूसची ५ डझनची पेटी अगदी ६०० ते १००० रुपयांपर्यंत मिळत आहे. आकाराने मोठा असलेलल्या आंब्याची पेटी १२०० ते १५०० रुपयांना विकली जात आहे. ज्या ठिकाणाहून थेट मागणी होत आहे, त्यावरच आंब्याचा बाजार सुरू आहे. त्याचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे आंबा उत्पादक आणि व्यापारी चिंतेत आहेत. हापूसच्या निर्यातीचे प्रमाणही कमी आहे. निर्यात वाढवण्यासाठी आंब्याच्या वाहतूक मार्गातील अडचणी कशा दूर करता येतील, यासाठी बाजार समिती प्रशासन, व्यापारी वर्गाचे प्रयत्न सुरु आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com