हवाई दलाने केली चार मच्छीमारांची सुटका

हवाई दलाने केली चार मच्छीमारांची सुटका
हवाई दलाने केली चार मच्छीमारांची सुटका

जम्मू, : भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने तावी नदीत अडकलेल्या चार मच्छीमारांची सोमवारी सुखरूप सुटका करण्यात आली. जोरदार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली होती. भगवतीनगर येथे पुलासाठी पाण्यात सिमेंटचे खांब उभारण्यात येत आहेत. या खांबाजवळ हे मच्छीमार अडकले होते. पाण्याला जोर असल्याने मच्छिमारांपर्यंत पोचण्यात पोलिस आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या पथकाला अपयश आल्यानंतर हवाई दलाला पाचारण करण्यात आले. हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी खांबाच्या पृष्ठभागावर उतरून दोराच्या शिडीने मच्छीमारांना वर ओढले. एका वेळी दोघांची अशा प्रकारे "एअरलिफ्ट' करीत चौघांचीही सुखरूप सुटका करण्यात आली. अन्य एका घटनेत हरकी पौडी येथे नदीत अडकलेल्या व्यक्तीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com