Agriculture news in marathi Five flying squads look at the seed market in Dhule district | Agrowon

धुळे जिल्ह्यात बियाणे बाजारावर पाच भरारी पथकांची नजर 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 मे 2020

धुळे : खरीप हंगाम २०२० मध्ये बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी भरारी पथके नियुक्त केले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली आहे. 

धुळे : खरीप हंगाम २०२० मध्ये बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी भरारी पथके नियुक्त केले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली आहे. 

खरीप हंगाम जवळ येत आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा वेळेत उपलब्ध व्हाव्यात म्हणून कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात बोगस बियाण्याची विक्री होऊ नये, यासाठी जिल्ह्यात पाच भरारी पथके तयार केली आहे. या पथकांमार्फत बोगस बियाणे विक्रीला प्रतिबंध करण्यात येणार आहे. या पथकांमध्ये तालुकास्तरावर चार, तर जिल्हास्तरावरील एका पथकाचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. त्याची पावती, खरेदी केलेल्या बियाणे पाकिटाचे टॅग व लॉट क्रमांक शेतकऱ्यांनी पडताळून पाहावा. 

पीक निघेपर्यंत ते सांभाळून ठेवावे. कीटकनाशके, तणनाशके खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी. गाडीवरुन खत विक्री करणाऱ्या फ्लाय सेलर्सकडून खतांची खरेदी करू नये. तसेच असे फ्लाय सेलर्स आढळले, तर ०२५६२- २३४५८० या क्रमांकावर संपर्क साधावा. खते खरेदी करताना बिले घ्यावीत. जास्त दराने व झिरो बिल पावतीवर खतांची विक्री होत असेल, तर याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी केले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...